लवकरच शेंदुर्णी करांसाठी 80 कोटीची भूमिकत गटार योजना मिळणार – नामदार गिरीश महाजन

257

प्रतिनिधी शेंदुर्णी – करांसाठी 65 लाखाची वाघुर धरणाहून पाणीपुरवठा योजना दिली. आता शेंदुर्णीकरांसाठी 80 कोटीची भूमिगत गटार योजना लवकरच मिळणार असल्याचे वक्तव्य आमदार गिरीश महाजन यांनी शेंदुर्णीच्या सभेत बोलताना केले.
65 कोटीची पाणीपुरवठा योजनेचे कोण शीला अनावरण त्यांनी नगरपंचायत प्रांगणात केले. त्या अगोदर वाडी तलाव दोन कोटी योजनेचे सुशोभीकरणाचे भूमिपूजन, महावीर नगर येथे व वाडी दरवाजा येथे जल कुंभाचे भूमिपूजन, 71 लाख किमतीच्या स्वच्छतागृहाचेही लोकार्पण सोहळा त्यांनी केला. शेंदुर्णी तील विविध संस्था, विकास सोसायटी तसेच विविध समाज, सामाजिक संस्थांकडून गिरीश महाजन यांचा मंत्री झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. शेंदुर्णी शहर डॉक्टर असोसिएशननेही डॉक्टरांच्या मागण्या संदर्भात गिरीश महाजन यांना निवेदन देऊन त्यांचा वैद्यकीय शिक्षण मंत्री झाल्याबद्दल सत्कार केला .
यावेळी बोलताना नामदार गिरीश महाजन यांनी
सांगितले की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक निर्णय घेतले . त्या सोबतच लोकाभिमुख कामे त्यांची सुरू आहेत. मला जामनेर तालुक्याने सहाव्यांदा प्रचंड मताधिक्याने निवडून दिले तालुक्यासाठी शेंदुर्णीकरांसाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही .शेंदुर्णी साठी पुन्हा ऐंशी कोटीची भूमिकत गटार योजना मिळणार आहे. शेंदुर्णी शहरासाठी महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा नक्कीच उभारल्या जाणार असल्याची ग ही त्यांनी यावेळी दिली .
प्रास्ताविक नगराध्यक्ष विजया खलसे यांनी केले, सूत्रसंचालन माजी उपनगराध्यक्ष निलेश थोरात व गोविंद अग्रवाल यांनी केले. आभार प्रदर्शन उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांनी केले .शेंदुर्णीत झालेली कामे व प्रस्तावित कामाचा उहापोह भाजपा नेते अमृत खलसे यांनी आपल्या भाषणात केला. शेंदुर्णीत सध्या सुरू असलेल्या कामाची माहिती मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी दिली.
नगरपंचायत प्रांगणात झालेल्या पाणीपुरवठा कोण शीला अनावरण प्रसंगी नामदार गिरीश महाजन, शेंदुर्णी नगरपंचायत नगराध्यक्ष विजया खलसे, उपनगराध्यक्ष गणेश पाटील, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, अभियंता भैय्यासाहेब पाटील, सुईज काझी, ठेकेदार संजय कुमावत पाचोरा ,समीर जोशी तांत्रिक सल्लागार, अमृत खलसे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल ,जामनेर तालुका प्रमुख भाजपा चंद्रकांत बाविस्कर ,पंडितराव जोहरे उत्तमराव थोरात, निलेश थोरात, नारायण गुजर ,माजी उपनगराध्यक्ष चंदा अग्रवाल, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजय अग्रवाल, नगरसेवक शरद बारी, राजेंद्र भारुडे ,अजय जागीरदार, तुकाराम पाटील ,यशवंत पाटील, दीपक पाटील सर्व नगरसेवक, नागरिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.