गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या बातमीची दखल . राशनिंग कंट्रोलर श्री.बगाटे यांनी दक्षता पथक (भरारी पथक) बरखास्त केले. तसे लेखी आदेश पारित करण्यात आले.

211

दिनेश चौधरी, लोहारा (प्रतिनिधी ) गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक तथा मंत्रालय विधिमंडळ येथील वरिष्ठ पत्रकार अनिलभाऊ महाजन यांनी दिनांक २५ एप्रिल २०२३ रोजी शिधावाटप नियंत्रक व अन्नपुरवठा संचालक (राशनिंग कंट्रोलर) यांच्या विभागातील दक्षता पथक (भरारी पथक) बाबत एक अभ्यासपूर्वक आर्टिकल लिहिले होते. सदर आर्टिकल सर्वत्र प्रसारित झाले आणि शासनाने त्या आर्टिकलची दखल घेत राशनिंग कंट्रोलर विभागाचे दक्षता पथक (भरारी पथक) ही विंग बरखास्त केली.

दिनांक २६ एप्रिल २०२३ रोजी श्री.बगाटे यांच्या सही निशी एक आदेश पारित करण्यात आला आहे. त्यामध्ये सदर भरारी पथकाबाबत शिधावाटप नियंत्रक खात्याची व अन्नपुरवठा मंत्रालयाची प्रतिमा मलिन होत आहे. शिधावाटप नियंत्रण कार्यालयात दक्षता पथकाच्या (भरारी पथक) अनेक अधिकाऱ्यांच्या नावाने पैसे वसुली बाबत. दिवाळी – होळी निमित्त गुणाकार करून वसुली करण्या बाबतच्या अनेक तक्रारी रेशनिंग कंट्रोलर यांच्याकडे करण्यात आले आहेत. त्यामुळे या (०१) श्री.अतुल विठ्ठल गढरी. (०२) श्री.पवनकुमार यादवराज कुंभले. (०३) श्री.राहूल रामचंद्र इंगळे (०४) श्री. प्रभाकर छगन चौगुले (०५) श्री. दिपक सुभाष कदम (०६) श्री. सुधीर विश्वनाथ गव्हाणे (०७) श्री. राजीव शिवदास भेले (०८) श्री.राजेंद्र अरुण पाटील (०९) श्री.मच्छिंद्र कुटे या सदरचे नऊ कर्मचाऱ्यांचे दक्षता पथक (भरारी पथक) रद्द करण्यात आले आहे.

सत्य पत्रकारिता लेखणीचा जोर आणि प्रामाणिक वरिष्ठ कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची विचारसरणी शुद्ध असली आणि दोन्ही कर्तव्यदक्ष असेल तर बोकाळलेला भ्रष्टाचार नक्की कमी होऊ शकतो. यातून हे दिसते राशनिंग कंट्रोलर श्री.बगाटे व अन्नपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्या या निर्णयामुळे समाजातून व अधिकारी – कर्मचारी वर्गातून यांचे कौतुक होत आहे श्री गाटे यांचे चांगल्या कार्याचे हि अभिनंदन सर्वत्र होत आहे.