त्रिविक्रमाच्या दर्शनासाठी जिल्हाधिकारी अमन मित्तल शेंदुर्णीत

363

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – प्रति पंढरपूर श्री शेत्र शेंदुर्णी येथे त्रिविक्रमाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी आज रात्रीपासूनच रांगा लावून गर्दी केली होती. रात्री महापूजेनंतर दर्शनासाठी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले .आज दुपारी जळगाव जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी श्री अमन मित्तल यांनी त्रिविक्रमाचे दर्शन मंदिरात जाऊन घेतले. मंदिराचे विश्वस्त व पुजारी भूषण देवकर यांनी त्यांच्या हस्ते त्रिविक्रमाची विधीवत पूजा केली. यावेळी त्यांचे सोबत भाजप जिल्हा उपजिल्हाप्रमुख गोविंद अग्रवाल व इतर मान्यवर उपस्थित होते जामनेर नगरपंचायत नगराध्यक्ष साधना महाजन व इतरही मान्यवरांनी जिल्हाभरातून मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली.