शेंदुर्णी येथिल ललवाणी विद्यालयाचे श्री.सुनिल मधुकर कुलकर्णी सेवानिवृत्त त्यानिमित्त सेवापुर्ती सोहळा संपन्न

338

प्रतिनिधी शेंदुर्णी ता. जामनेर – शेंदुर्णी येथिल ललवाणी विद्यालयाचे लिपिक श्री .सुनिल मधुकर कुलकर्णी हे नियतवयोमानानुसार आज २०/०६/२०२३ शुक्रवारी सेवानिवृत्त झाले.त्यानिमित्त विद्यालयात त्यांचे सेवापुर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमची सुरूवात विद्यालयातील विद्यार्थीनी यांनी ईशस्तवन व स्वागत गिताने केले.सरस्वती व राजमल शेठ यांच्या प्रतिमेचे पुजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे समन्वयक तथा जामनेर येथील वरीष्ठ महाविद्यालये प्रा.अतुल साबद्रा सर होते.प्रमुख अतिथी प्रा.डाँ.आर.एच.बारीसर, निवृत्ती सरस्वती लोड ,प्रभारी केंद्रप्रमुख निवृत्ती जोहरे, दगडु पाटील ,गावातील श्री .गोविंदशेठ अग्रवाल ,श्री .उत्तम थोरात, श्री .प्रकाश झंवर ,सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, श्रीकृष्ण विद्यालयाच्या मुख्याध्यापिका इंगळे मँडम ,खाजगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मोहन पाटील उपस्थित होते .कार्यक्रमाचे अध्यक्ष व अतिथी यांचे विद्यालयाचे वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य / मुख्याध्यापक प्रमोद खलसे यांनी केले व भाऊसाहेब यांना सेवापुर्ती निमित्त शुभेच्छा देऊन त्यांनी केलेल्या सेवेचे अनुभव सांगितले .प्राथमिक विभागातुन प्र.मुख्याध्यापक श्री .सतिष खोडपे सर,माध्यमिक विभागातील श्रीमती.वंदना सोनवणे मँडम व उच्चमाध्यमिक विभागप्रमुख श्री .व्हि .के.वाघसर यांनी त्यांच्या विषयी विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सत्कार मुर्ती श्री सुनिल कुलकर्णी (बाळुभाऊ) यांचा सपत्नीक सत्कार अध्यक्ष अतुल साबद्रा सर यांचे हस्ते शाल श्रीफळ मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. सावित्रीबाई फुले विद्यालयाचे उपशिक्षक हरीभाऊ राऊत ,बजरंग राजपुत, डाँ विजयानंद कुलकर्णी ,गरूड प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौदामिनी गरूड, श्री .विलास अहिरे,अतुल जहागिरदार ,युवराज सुर्यवंशी ,अँड.देवेंद्र पारळकर ,मनोज जोशी ,प्रा.सपकाळे, इंदिराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक सुधीर अग्रवाल, राणीलक्ष्मीबाई पतसंस्थेतर्फे उत्तम थोरात, पारस पतसंस्थेतर्फे अध्यक्ष गोविंद शेठ अग्रवाल ,मौलाना आझाद पतसंंस्थेमार्फत मँनेजर नज्जू काझी, मँनेजर प्रमोद कासार,यांनी व विद्यालयातर्फे मुख्याध्यापक प्रमोद खलसे ,सतिष खोडपे ,विनोद वाघसर, यांनी शाल, श्रीफळ,ड्रेस पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सपत्निक कुटुंबासह सत्कार केला.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा अतुल साबद्रा यांनी लिपिक बाळु कुलकर्णी यांनी केलेल्या कामाचे स्वरूप व शाळेविषयी असलेली आस्था सांगितली .सत्काराला उत्तर देताना भाऊसाहेब यांनी शाळेच्या स्थापने पासुन शाळामान्यता ,शिक्षक मान्यता येणाऱ्या अडचणी ,शाळेची उत्तरोत्तर होत असलेली प्रगती थोडक्यात सांगितली .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्यालयाचे उपशिक्षक व्हि .टी.नाईक सर यांनी केले व आभार विद्यालयाचे उपशिक्षक के.एस .ठाकुर सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी सहकार्य केले.