लोकशाही वृत्तवाहिनीचे संपादक श्री कमलेश सुतार यांना वाय प्लस (Y+) दर्जाची पोलीस सुरक्षा देण्याची मागणी

169

लोकशाही वृत्तवाहिनीचे संपादक श्री कमलेश सुतार यांना वाय प्लस (Y+) दर्जाची पोलीस सुरक्षा देण्याची मागणी वेब मीडिया असोसिएशन तर्फे राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. – अनिल महाजन. अध्यक्ष, वेब मीडिया असोसिएशन.

दिनेश चौधरी, लोहारा (प्रतिनिधी ) आज दि.18 रोजी विधिमंडळ अधिवेशनात गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात डिजिटल मीडिया वेब मीडिया असोसिएशनच्या वतीने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वरिष्ठ पत्रकारांच्या शिष्टमंडळाने व वेब मीडिया असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी कमलेश सुतार वरिष्ठ पत्रकार, मुख्य संपादक लोकशाही न्यूज चॅनेल यांना वाय प्लस (y +) दर्जाची पोलीस सुरक्षा प्रधान करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. काल लोकशाही वृत्तवाहिनीवर भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्यामुळे राजकीय पक्षातील काही समाजविघातक यांच्याकडून कमलेश सुतार यांना धोका निर्माण झालेला आहे. पत्रकारांच्या वतीने गृहमंत्री व पोलीस महासंचालक यांना ई-मेलद्वारेही निवेदन पाठविण्यात आलेले आहे.