मराठा बांधवांवर झालेल्या लाठीमाराचे विरोधात उद्या शेंदूर्णी बंद

197

शेंदूर्णी –  जालना जिल्ह्यातील आंतर वली सराटी येथे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या मराठा समाज बांधवांवर पोलिस प्रशासनाकडून अमानुषपणे लाठीमार करण्यात आला त्यात अनेक माता भगिनी वृद्ध,बालक व युवक जखमी झाले त्या क्रूर हल्ल्याच्या निषेधार्थ शेंदूर्णी येथे उद्या दिनांक ५/९/२३ मंगळवार रोजी गाव बंदची हाक देण्यात आली असून उद्या दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे तरी व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने/प्रतिष्ठाने बंद ठेऊन मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा द्यावा असे आवाहन सकल मराठा समाज शेंदूर्णी यांचे कडून करण्यात आले आहे.