शेंदुर्णी दहीहंडीचा जल्लोष , सार्वजनिक दहीहंडी उत्सव मंडळाकडून 39 व्या वर्षी मोठ्या धामधुमीत दहीहंडी उत्सव साजरा

551


शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – शेंदुर्णी येथे 39 व्या वर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या धामधुमीत उत्साहात साजरा झाला ,
दहीहंडीची विधीवत पूजाअर्चा आरती पहुर दरवाजा समोरील हनुमान मंदिरात करण्यात आली. दहीहंडी चे पूजन शिवसेना जिल्हाप्रमुख दीपक राजपूत, तालुकाप्रमुख एडवोकेट ज्ञानेश्वर बोरसे, डॉ. नीलम कुमार अग्रवाल ,गोविंदभाई अग्रवाल ,अमृतबापू खलसे , डॉ. सागरदादा  गरुड, दगडू दादा पाटील आदींनी केली .
यानंतर दहीहंडीची मिरवणूक गोपाळपूर येथील दहीहंडी फोडण्यासाठी गेली व त्यानंतर वाडी दरवाजा, गांधी चौक, अग्रसेन चौक, पारस चौक ,कुमावत गल्ली, कुंभार गल्ली, पहुर दरवाजा हनुमान मंदिर व इतरही ठिकाणी सार्वजनिक दहीहंडी उत्सव समितीच्या गोपालांनी दहीहंड्या फोडल्या. गोपाला रे गोपाला या गाण्यांवर तरुणांनी गोपालांनी नृत्य करून दहीहंडीची शोभा वाढवली.

यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख दीपक राजपूत यांनी सांगितले की दहीहंडी उत्सव हा शेंदुर्णीत 39 व्या वर्षात मोठ्या उत्साहात व भक्ती भावात पदार्पण करत आहे. ही खूप मोठी बाब आहे .आगामी काळातले ही गणपती ,नवरात्र आधी उत्सव शांततेत मोठ्या धामधुमीत व पारंपारिक पद्धतीने साजरी करावे. जयंती पूजनानंतर मान्यवरांचा सत्कार गोपाल पथकांनी केला .दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने शिवसेना शहरप्रमुख संजय सूर्यवंशी ,युवा सेना अधिकारी अजय भोई, युवराज बारी ,कैलास काबरा, शेतकरी नेते सुनील अग्रवाल, बारकू जाधव, अशोक बारी, विठ्ठल बारी, अमरीश गरुड ,विठल गरुड, सोनू भोई, नगरसेवक शरद बारी, ऋषिकेश अग्रवाल, संदीप बारी ,महेंद्र गुजर, तुकाराम पाटील ,विशाल शिंपी,निलेश गुरव, सचिन कुमावत ,सुनील अग्रवाल, सुशील अग्रवाल व सर्व गोपालांनी परिश्रम घेतले.

पहूर पो. स्टे. चे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक दिलीप पाटील , शशीकांत पाटील , विरणारे , मनोज गुजर आदी पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .