नगरपंचायत मालमत्ता व दस्तऐवजला धोका संबंधितांनी लक्ष घालण्याची मागणी.

299

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – शेंदुर्णी नगरपंचायत प्रांगणात गेल्या आठ ते दहा दिवसापासून टवाळखोर व इतरांचा धुडगूस चालू आहे. त्यांचे होणारे उपद्वाप मुळे शासकीय दस्तऐवज व नगरपंचायत मालमत्तेचे होणारे नुकसान रोखावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शेंदुर्णी नगरपंचायत च्या ओट्यावर व तलाठी कार्यालयाच्या ओट्यावर आमने सामने दोन गटांनी एकमेकांवर फटाके बॉम्ब फेकले त्यातील काही बाम इमारतीमध्येही गेले. काही गच्चीवर गेले याबाबतीत सुजाण नागरिकांनी लागलीस तलाठी कार्यालय व पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पुढील अनर्थ रोखला.
रात्री एक एक वाजेपर्यंत टवाळखोरांचा तेथे धुडगूस चालू असतो. नगरपंचायत चे मुख्य इमारत, ध्वजरोहन स्तंभ ,तलाठी कार्यालयाची इमारत त्,यातील महत्त्वाचे दस्तऐवज, संगणक, घंटा गाड्या, ट्रॅक्टर ,फिरते सुलभ शौचालय आधी मालमत्त्या ला मोठी आणि होऊन त्याचे नुकसान होऊ शकते.
नगरपंचायत व पोलीस खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर परिसराला कंपाऊंड करावे. मालमत्तेचे रात्री संरक्षण करावे. रात्री 10 नंतर फिरणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त करावा. त्यांच्यावर नगर पंचायतीने कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने होत आहे.