जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांचा मनमानी कारभार – जनतेच्या तक्रारी , मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन व जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे कारवाहीची मागणी .

403

प्रतिनिधी जामनेर – जामनेर तहसील कार्यालयाचे यापूर्वीचे तहसीलदार अरुण शेवाळे साहेब होते त्यावेळी त्यांच्या कार्यकाळ कारकीर्दीत त्यांनी कायदेशीर तसेच चांगली कामे केली आहेत , त्यांच्या हातून जनतेची व शेतकऱ्याची सर्व कामे वेळेवर होत होती कार्यालयातील कामे खोळबंत नव्हती त्यामुळे कोणाच्याही तक्रारी येत नव्हत्या , परंतु आताचे कार्यरत तहसीलदार नानासाहेब आगळे साहेब आले तेव्हापासून तालुक्यातील जनतेचे कोणतेही काम वेळेवर होत नाही तसेच कार्यालयातील अनेक कामे खोळंबली आहेत म. तहसीलदार आगळे साहेब हे आपल्या पदाचा दुरुपयोग करून कर्तव्यात कसूर करीत आहे .
जामनेर तालुक्यातील जनतेचे १५५ प्रमाणे ऑनलाइन ७ /१२ उतारा दुरुस्तीचे कामे दोन दोन महिने होत नाही प्रत्येक विषयावर चर्चा करा असा रिमार्क मारल्या जातो , कार्यालयातील अनेक विविध प्रकारचे प्रकरणे आदेश यावर लवकर सह्या करीत नाही त्यामुळे कर्मचारी परेशान झाले आहेत कायदेशीर कामात देखील क्युरी काढली जाते एकाच वेळी योग्य सल्ला व मार्गदर्शन केले जात नाही प्रत्येक वेळी वेगवेगळा कागद मागितला जातो , कामे होत नसल्याने तहसील कार्यालयात लोक तलाठी तसेच मंडळ अधिकारी व कार्यालयातील कर्मचारी यांना वेठीस धरून त्यांच्याशी वाद घालतांना दिसून येतात शेवटी कंटाळून ना इलाजास्तव लोक तहसीलदार नानासाहेब आगळे यांना भेटतात आणि विचारतात की साहेब कागदपत्रे किलीयर असतांना कामे का होत नाही , साहेब सागतात त्यावर चर्चा करावी लागेल चर्चा होते पण काम काही होत नाही असा प्रत्यक्ष अनुभव तालुक्यातील लोकांना येत आहे . तसेच तक्रारी अर्जावर चौकशी होऊन कारवाही होत नाही परस्पर आर्थिक सेटिंग केली जात असल्याची माहिती मिळाली आहे व आर्थिक देवाण घेवाण करून कोणतीही चौकशी न करता शेतजमीन बिनशेती करण्याचे कामे होत आहे असल्याची तालुक्यात चर्चा आहे .
म. तहसीलदार नानासाहेब आगळे स्वतः ला जिल्हाधिकारी समजत असून तालुक्यातील गोर गरीब अनाडी जनतेला व शेतकरी लोकांना वेठीस धरून त्रास देत आहे एक किरकोळ कामासाठी किती तरी चकरा मारव्या लागतात जाणून बुजून हेतूपुरस्कर आर्थिक फायद्यासाठी प्रकरण लांबविले जाते त्यामुळे लोकांचे शारीरिक मानसिक व आर्थिक नुकसान होत आहे अशा जामनेर तहसील येथे अनेक समस्या असून म. तहसीलदार साहेब यांच्या मनमानी कारभाराने जनता त्रस्त झाली आहे म्हणून मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन व जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांनी म. तहसीलदार नानासाहेब आगळे याचेवर कारवाही करून त्यांची बदली करावी अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे , तूर्त इतकेच..!