गरुड विद्यालयात संस्थेचे प्रेरणास्थान कै.आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांचा 39 वा स्मृतिदिन उत्साहात साजरा.

451

शेंदुर्णी:-  आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी. विद्यालयात संस्थेचे प्रेरणास्थान आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांची 39 वी पुण्यतिथी सोहळा संपन्न करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन म्हणून करण्यात आली. यानंतर प्रतिमा पूजन करण्यात आले व आलेल्या मान्यवराचा सत्कार शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाची प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस पी उदार यांनी केले. यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या क्षणी आपले मनोगत मराठी, इंग्रजी ,बंजारा भाषेमध्ये मनोगत व्यक्त केले तसेच या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद मधील गरीब व होतकरू मुलांना गणवेश वाटप यावेळी करण्यात आला. यानंतर संस्थेचे ज्येष्ठ संचालक सागर मलजी जैन यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी आचार्य बापूंच्या काळातल्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न आपल्या मनोगत मधून केला त्यानंतर संस्थेचे सचिव सतीश जी काशीद यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून आर सी पटेल शिरपूर येथील प्राचार्य डॉ. संजीव जी कुमार बारी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व व शिक्षणामुळे होणारी प्रगती याच्याबद्दल याप्रसंगी मार्गदर्शन केलं व उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यानंतर अध्यक्ष भाषण संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयजी गरुड यांनी केले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती याप्रसंगी लाभली यामध्ये शिरपूर येथील आर सी पटेल महाविद्यालयाची प्राचार्य डॉ. संजीवजी कुमार बारी तसेच संस्थेचे चेअरमन संजयजी गरुड,संस्थेचे सचिव सतीश चंद्र काशीद, संस्थेचेज्येष्ठ संचालक सागर मलजी जैन, संस्थेच्या महिला संचालिका उज्वलाताई काशीद, संस्थेचे संचालक अभिजीत दादा काशीद, तसेच शांतारामबापू गुजर, सुधाकर बारी, मुख्याध्यापक एस पी उदार, उपमुख्याध्यापक शशिकांत शिंदे, पर्यवेक्षक जे.एस. जुबळे,विनोद पाटील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी पत्रकार बंधू, पालक ,विद्यार्थी या सर्वांची उपस्थिती या प्रसंगी लाभली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक पी.जी. पाटील यांनी केले तर आभार डी. बी. पाटील यांनी मानले.