शेंदुर्णीची कन्या सौ.ऐश्वर्या साने – थत्ते दि १४ जानेवारी रविवार रोजी सादर करणार कथ्थक नृत्यविष्कार ..”नृत्य साधना “कार्यक्रमाचे आयोजन .

398

शेंदुर्णी ता.जामनेर, प्रतिनिधी

शेंदुर्णी येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ कै. डॉ . चारुदत्त साने व डॉ.कौमुदी साने यांची कन्या सौ .ऐश्वर्या साने -थत्ते या सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगणा आहेत . त्यांच्या कथ्थक नृत्याचे सादरीकरण “नृत्य साधना ” या कार्यक्रमाद्वारे शेंदुर्णी मध्ये आयोजन करण्यात आले आहे .

सौ . ऐश्वर्या व समुहाचे कथ्थक कार्यक्रम देश विदेशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सादर झालेले आहेत . प्रतिष्ठित भारतीय महोत्सव, तिरुपती तिरुमाला महोत्सव, पूणे महोत्सव, कटक महोत्सव यांमध्ये त्यांचे नृत्याचे सादरीकरण झालेले आहे , विविध देशात कथ्थक नृत्य सादरीकरणात भारत देशाचे प्रतिनिधित्व म्हणून समावेश झाला आहे ,दिल्ली येथील राजपथावर देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यासमोर “वंदे भारतम्” या अंतर्गत कथ्थक नृत्य दर्शनाचा कार्यक्रम सादर झालेला आहे .राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पारितोषिके सौ . ऐश्वर्या व समूहाला मिळालेले आहेत .

आपल्या शेंदुर्णी या मातृभूमीत सौ . ऐश्वर्या व सहकारी समूह “नृत्यसाधना” या कार्यक्रमाद्वारे द्रोपदी वस्त्रहरण , राम भजन , फ्युजन ,कथ्थक नृत्यविष्कार सादर करणार आहेत.दिनांक 14 जानेवारी वार रविवारी रोजी रात्री ठीक आठ वाजता शेंदुर्णी नगरपंचायत च्या प्रांगणा मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .दर्जेदार कथ्थक नृत्यविष्कार प्रत्यक्षात पाहण्याची संधी शेंदुर्णी तसेच परिसरातील सर्व रसिकांना मिळालेली आहे .

या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते होणार आहे .कार्यक्रमाच्या अध्यक्षा जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन असतील . तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी शेंदुर्णी व परिसरातील नागरिकांनी या कथ्थक नृत्याविष्काराचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा असे आवाहन डॉ .कौमुदी साने , डॉ. कल्पक साने व सहकारी यांनी केलेले आहे .