गरुड शिक्षण संस्थेच्या चेअरमन पदी सजय गरुड तर व्हा. चेअरमन पदी भिमराव शेळके यांची निवड

148

 

शेंदुर्णी ता जामनेर
३१ डिसेंबर रोजी झालेल्या धी शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत या संस्थेचे चेअरमन संजय दादा गरुड यांच्या नेतत्वाखालील आचार्य विद्या विकास पॅनल चा दणदणीत विजय झाला होता .

आज दि १२ रोजी शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या नवनिर्वाचीत संचालकांची विशेष बैठक निवडणूक आधिकरी एस एस पवार सहकार अधिकारी जामनेर यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या कार्यालयात आयोजीत करण्यात आली होती. यावेळी चेअरमन पदासाठी संजय गरुड यांचा एकमात्र अर्ज दाखल झाल्याने संजय गरुड यांची शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली. तर व्हाइस चेअरमन पदा साठी देखील नवनिर्वाचीत संचालकां मधील सर्वात ज्येष्ठ संचालक श्री आबासाहेब शेळके (लोहारां) यांचा एकमात्र अर्ज दाखल झाल्याने त्यांची देखील व्हाइस चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक आधिकारी एस एस पवार यांनी यावेळी केली .

यावेळी दहा पैकी नऊ संचालक बैठकीस उपस्थित होते .तर देवश्री सतीशचंद्र काशीद या संचालिका गैर हजर होत्या . यावेळी प्रवीण भाऊ गरुड, दिनेश आबा पाटील, डॉ देवेंद्र शेळके, स्नेहदिप गरुड, यांचे सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.