ऐश्वर्याच्या कथ्थक नृत्याने शेंदुर्णीकरांची जिंकली मने .. “नृत्य साधना ” कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद ..

420

 

शेंदुर्णी – कथ्थक या शास्त्रीय नृत्यकलेच्या आस्वाद रसिकांना घेता यावा यासाठी “नृत्य साधना “सादरीकरणाचा कार्यक्रम येथील ऐश्वर्या साने आणि तिच्या पुणे येथील सहकारी नृत्य कलाकारांनी अत्यंत बहारदारपणे सादर केला. या सुंदर व मनोहारी कार्यक्रमाने रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळविला.
शेंदूर्णी येथील सुप्रसिद्ध ह्दय रोग तज्ञ कै. डॉ . चारुदत्त साने व कौमुदी साने यांची कन्या ऐश्वर्या हिने आपले कथ्थक नृत्याचे शिक्षण ललित कला विद्यापीठ व भारती विद्यापीठ पुणे येथे घेतले . गुरु तेजस्वीनी साठे यांच्या मार्गदर्शनाखाली कथ्थक पूर्ण केले . फॉन्स , जर्मनी , बेल्जीयम , ऑस्ट्रेलिया , नेदरलॅन्ड , येथेही कथ्थकचे सादरीकरण केले . ७५ व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वंदे भारत अभियान मध्ये सहभाग राष्ट्रपती , प्रंतप्रधान यांच्या समोर दिल्ली येथे सादरीकरण केले .आपल्या जन्मगावी शास्त्रीय नृत्य रसिकांना कथ्थक नृत्यकलेचा आस्वाद घेता यावा यासाठी साने परिवाराच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात
आला होता . या प्रसंगी मान्यवरांच्या व गावकर्यांच्या वतीने ऐश्वर्या साने थत्ते हिचा सत्कार करण्यात आला होता .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐश्वर्या साने
हिने कृष्ण स्तृती ने केला . नंतर मयसभेतील द्रोपदी सादर केली . प्रेक्षकांनी याला भरभरून दाद दिली .त्यानंतर ऐश्वर्या साने- थत्ते ,रिना लेले, कु. ईशा ओझा व अरूंधती अभ्यंकर या सर्व कलाकारांनी ताल बंसत , बदरीया नंतर मल्हार जाम या फ्युजनने कार्य कार्यक्रमाची सांगता झाली .
कार्यक्रमाचे उद्‌‌घाटन जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन होत्या. अध्यक्षस्थानी बेटी बचाव बेटी पढाओचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र फडके होते. भाजपाचे जेष्ठ नेते गोविंद अग्रवाल ,शेंदुर्णी नगरपंचायत च्या नगराध्यक्षा विजयाताई खलसे , अमृत बापू खलसे , चंदाताई अग्रवाल , शकुंतला काकू गरुड , ,सतीशचंद्रजी काशीद व उज्वला काशीद .प्राजक्ता गरुड , राजेंद्र भारुडे , निलेश थोरात ,विनीत जोशी , आदी मान्यवर उपस्थितीत होते.
असेच बहारदार आणि दर्जेदार कार्यक्रम शेंदुर्णी नगरीत वारंवार व्हावेत अशी अपेक्षा अध्यक्षांनी व गावकऱ्यांनी व्यक्त केली. कडाक्याच्या थंडीतही डोळ्यांना खिळवून ठेवणारे नृत्य सादर केल्या मुळे शेवट पर्यत हजारो रसिकांनी मनसोक्त आस्वाद घेतला
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जान्हवी सूर्यवंशी व मीरा इंगळे यांनी केले . तर आभार डॉ कल्पक साने यांनी मानले