मौलाना आझाद पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन स्व. शेरुभाई काझी यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त ए. टी. एम. कार्डचा २६ रोजी उद्घाटन समारंभ पत्रपरिषदेत चेअरमन इमामोद्दीन हिसामोद्दीन यांची माहिती

31

शेंदुर्णी, ता. जामनेर | येथील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य हिंदू-मुस्लीम एकात्मतेची नावलौकिक असलेली मौलाना आझाद सहकारी पतसंस्थेने सभासद व ग्राहकांसाठी नवीन प्रणालीच्या संगणीकृत नेटबँकीग सुविधासाठी संस्थेच्या वतीने ए.टी.एम. कार्डचा शुभारंभ सोहळा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन व सहकार महर्षी शेरुभाई काझी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्ताचे औचित्य साधून सोमवार, २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. होणार आहे.
प्रमुख अतिथी म्हणून जामनेरचे सहाय्यक निबंधक जगदीश बारी , कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने उपस्थित राहणार आहे. अशी माहिती पतसंस्थेचे चेअरमन इमामोद्दीन हिसामोद्दीन, व्यवस्थापक नजमोद्दीन काझी यांनी संस्थेच्या कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत दिली. यावेळी संस्थेचे संचालक व मार्गदर्शक उत्तमराव थोरात उपस्थित होते.
मौलाना आझाद सह. पतसंस्था नवीन प्रणालीच्या संगणीकृत पद्धतीने सर्व व्यवहार करीत आहे. संस्थेकडे आज रोजी ऑनलाईन कामकाज एन.एफ.टी. आर.टी. जी. एस. एस.एम.एस. मोबाईल अॅप, क्युआर कोड सुरू आहे. सभासदांच्या हितासाठी सदैव तत्पर सेवा देणारी ऑनलाईन बँकींग सेवा देणारी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकमेव पतसंस्था आहे.