शेंदुर्णीत मंदिरांसाठी आलेल्या चार कोटींच्या निधीचे भूमिपूजन समारंभ संपन्न.

30

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – शेंदुर्णी येथील तीन मंदिरांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने चार कोटीचा भरीव निधी आला. त्याकरिता भूमिपूजन नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
येथील पहूर दरवाजा समोरील हनुमान मंदिर ,पाचोरा रोडवरील मंमादेवी मंदिर, सात उंबर देवस्थान येथे भाविकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता मंदिरात भजन कीर्तनां करता सभागृह, आलेल्या भाविकांना राहण्याची व्यवस्था ,पाणी व इतर सर्व सुविधा मिळण्याकरता शेंदुर्णी नगरपंचायत चे मुख्याधिकारी साजिद पिंजारी, तत्कालीन नगराध्यक्ष विजया खलसे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी नामदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केला होता, त्याला यश येऊन चार कोटीचा निधी तीन मंदिरा करता प्राप्त झालेला होता, आचारसंहिते पूर्वी लगेचच काम सुरू व्हावे या करता महाराष्ट्र राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते त्यांनी भूमिपूजन सोहळा पार पडला. तसेच गिरीश महाजन यांच्या हस्ते जळगाव जनता सहकारी बँकेचे ही शुभारंभ आज करण्यात आला.
यावेळी बोलताना ना. गिरीश महाजन यांनी सांगितले की शेंदुर्णी रस्ते, गटारी ,पाणी ,मंदिऱात येणाऱ्या भाविकाकरिता सुविधा व इतर सर्व बाबीसाठी भरघोस निधी सातत्याने उपलब्ध होत आहे .यापुढेही निधी कमी पडू दिल्या जाणार नाही .
यावेळी ना गिरीश महाजन, भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड ,अमृत खलसे, उत्तम थोरात ,मुख्याधिकारी साजिद पिंजारी, पंडितराव जोहरे , माजी उपनगराध्यक्ष निलेश थोरात ,माजी नगरसेवक शरद बारी, राजेंद्र भारुडे, पंडितराव जोहरे. राजेंद्र पवार ,विजय काबरा, अरुण जोशी ,सागर गरुड, नीलमकुमार अग्रवाल, पंकज सूर्यवंशी, राजेंद्र गुजर,शांताराम गुजर, सुनील शिनकर, सुधाकर बारी, नगरपंचायत चे विविध अधिकारी, कर्मचारी ,विविध मंदिराचे ट्रस्टी ,नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.