पहूर पोलिसांनी अट्टल गुन्हेगार मयूर जोशीला सापळा रचून केली अटक , जिल्हा कारागृहात रवानगी

148

पहूर, ता. जामनेर : पहूर परिसरासह जिल्ह्यात आपली दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगार मयूर श्याम जोशी रा. पहूर कसबे यास पहूर पोलिसांनी सापळा रचून शिताफीने अटक केली. जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता वेळोवेळी उल्लंघन करून दाखल असलेल्या खटल्याकामी न्यायालयात उपस्थिती देत नव्हता. जिल्हा न्यायाधीश वर्ग-१ व अतिरिक्त सत्र न्यायालय जळगाव यांचेकडील खटला क्र.१२२/२०१९ मधील अट्टल गुन्हेगार आरोपी मयूर श्याम जोशी रा. पहूर कसबे ता. जामनेर याचे नावे अजामीन पात्र पकड वारंट न्यालायाने काढले होते. त्यानुसार आदेशाची अंमल बजावणी करण्यात येऊन पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी त्याच्यावर पाळत ठेवीत सापळा रचून शिताफीने अटक केली. आरोपी मयूर जोशी या अट्टल गुन्हेगारावर मुक्ताईनगर पोलीस स्टेशन, जिल्हापेठ पोलीस स्टेशन जळगाव, रामानंद पोलीस स्टेशन जळगाव इ. पोलीस स्टेशनात गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यासह त्याच्यावर पहूर पोलिसांकडून कारवाई करण्यात येऊन जिल्हा सत्र न्यायालयासमोर १२ मार्च रोजी हजर करण्यात आले.
जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपी मयूर जोशी याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पहूरसह परिसरात उपद्रव माजवणारा आरोपी मयूर जोशी याला अटक केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.