शेंदुर्णी नगरीत रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न.

59

शेंदुर्णी – विश्व हिंदू परिषद बजरंग दल व ममता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज प्रति पंढरपूर श्री क्षेत्र शेंदुर्णी नगरी ममता हॉस्पिटल या ठिकाणी शिवराज्याभिषेक ३५० वे वर्ष तसेच ममता हॉस्पिटल यांच्या चौथ्या वर्धापन दिना निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.प्रसंगी ज्येष्ठ स्वयंसेवक उत्तमराव थोरात तसेच भाजपा नेते गोविंद अग्रवाल यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले.प्रसंगी ७५ रक्तदात्यानी रक्तदान केले.
रक्तदानाचे महत्त्व लक्षात घेता प्रत्येक वर्षी शेंदुर्णीनगरी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. तसेच प्रत्येक रक्तदात्यास ममता हॉस्पिटल संचालक डॉ.चेतन अग्रवाल , डॉ.पूजा अग्रवाल राहुल अग्रवाल व अभिषेक अग्रवाल यांच्या वतीने एक रोपटे तर वि.हिं.प च्या वतीने शिवराज्याभिषेकाची प्रतिमा भेट देण्यात आली.प्रसंगी वि.हि.प कार्यकर्ते वामन फासे,प्रखंड संयोजक पप्पू वाघ,भूषण दामधर,घनशाम माळी ,पवन अग्रवाल,बबलू गुजर,वैभव बारी, भरत तेली, आतुल पाटील, विक्रम माळी, नयन अग्रवाल,अर्जुन न्हावी,हर्षल बारी आकाश गवळी,किरण गोंधळी, भाग्येश बारी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्र संचालन अभाविप जळगांव महानगर मंत्री मयूर माळी यांनी केले.