पहूर पोलिसांचा पाळधी शिवारातील गावठी हातभट्टीवर हातोडा

99

प्रतिनिधी पहूर ता. जामनेर –  आचार संहिता लागू झाल्यापासून जळगाव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष  पोलीस अधीक्षक डॉ . महेश्वर रेड्डी साहेब व पाचोरा भागचे उपविभागीय पोलीस अधिकारी येरुडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पहूर पोलिसांनी अवैध धंद्यांच्या विरोधात वाश आउट मोहीम हाती घेतली आहे अशीच धडक कारवाही आज दि.25/3/24 रोजी पहूर पो. स्टे. ला गोपनीय बातमीदाराने दिलेल्या बातमीनुसार पाळधी व नाचनखेडा गाव परिसरात वाघुर नदीकाठी इसम नामे कैलास झिपरू भोई व ईश्वर झिपरू भोई हे स्वतंत्ररित्या गावठी हातभट्टी चालवत आहेत. सदर माहिती वरून पहूर पो. स्टे. चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सचिन सानप साहेब स्वतः तात्काळ ऑन द स्पॉट जागेवर जाऊन कार्यवाही केली आहे. यावेळी त्याच्या सोबत पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर ठाकरे, गजानन ढाकणे, होमगार्ड हिरालाल बारी, होमगार्ड आर.पी. देशमुख, चालक हेमंत सोनवणे होते पहूर पोलिसांनी सदर ठिकाणी पंचासह छापा टाकून बेकायदेशीर रित्या गावठी हातभट्टी तयार करणारे कच्चे रसायन एकूण बॅरल 10, अंदाजे दोन हजार लिटर, किंमत रुपये 40,000/ किमतीचे असे जागीच मिळून आल्याने पंचा समक्ष रासायनिक परीक्षणाकरिता सॅम्पल काढून उर्वरित कच्चे रसायन व दारू पाडण्याचे साधनसामग्री जागीच जाळून नष्ट करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहूर पो. स्टे. चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सचिन सानप साहेब यांनी आपल्या हद्दीत नेहमी अशा कारवाया करून अवैध धंदे आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले आहे त्यांच्या धाकाने अनेकांनी आपले धंदे बंद करून टाकले आहे तसेच सदर कारवाही मुळे गावठी हातभट्टीवाल्यांचे धाबे दणाणले असून पहूर पोलिसांचे कौतुक केले जात आहे .