शेंदुर्णी येथे ना.गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत गुरुवारी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा

77

 शेंदुर्णी प्रतिनिधी – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेंदुर्णी -नाचनखेडा व लोहारा – कुऱ्हाड जिल्हा परिषद गटातील भाजप कार्यकर्त्याच्या मेळाव्याचे आयोजन दिनांक २८/३/२०२४ गुरुवार रोजी सकाळी ९.०० वाजता येथील पारस मंगल कार्यालयात करण्यात आले आहे.
कार्यकर्ता मेळाव्यात ना.गिरीश महाजन मार्गदर्शन करणार असून भाजप जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज, खा. रक्षाताई खडसे , संजयदादा गरूड यांची उपस्थिती लाभणार आहे. सदर मेळाव्यासाठी जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्ते, महिला भगिनी यांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन शेंदुर्णी शहर भाजप कडून करण्यात आले आहे.