शतकोत्तर परंपरा असलेल्या शेंदुर्णीच्या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास आज पासुन प्रारंभ

5

शेंदुर्णी या.जामनेर, प्रतिनिधी
खान्देशातील विख्यात संतकवि आणि भगवंत् भक्त वै.भीमराव मामा पारकर यांच्या प्रेरणेने व वै.गोविंदराव पारळकर यांच्या अथक प्रयत्नाने व ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू असलेला व शतकोत्तर परंपरा असलेल्या शेंदुर्णीच्या श्रीराम जन्मोत्सव सोहळा यंदाही गुढीपाडव्याच्या दिवशी पासुन प्रारंभ होणार असुन यानिमित्ताने कीर्तन, जन्मोत्सव सोहळा व सवाद्य पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.यंदाचे श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे हे १०३ वेळ वर्ष आहे.
चै.शु.प्रतिपदा दि०९/०४/२०२४ मंगळवार ते चै.शु.अष्टमी दि.१६/०४/२०२४ मंगळवार पर्यंत दररोज रात्री ८-३० वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रा.डॉ.स्मिताताई अलोणी ( नागपुर ) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असुन त्यांना तबल्यावर दिलीप गुरव ( धुळे ) तर हार्मोनियम वर गोविंदराव मोकाशी ( पाचोरा) हे करणार आहे.
चै.शु.नवमी दि.१७/०४/२०२४ बुधवार रोजी सकाळी १० वाजता संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे गादी वारस ह.भ.प.शांताराम महाराज भगत यांचे श्रीराम जन्मोत्सवाचे रसाळ कीर्तन होणार असुन दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा होईल यासाठी वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ यांची साथसंगत लाभणार आहे.दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा व प्रसाद वितरण करण्यात येणार आहे.
रात्री ८ वाजता श्री.ची शहरातुन भव्य पालखी मिरवणुक पालखी मिरवणुक निघणार आहे.या सोहळ्यासाठी हे.भ.प.वारकरी संप्रदाय भजनी मंडळ, हरिपाठ महिला भजनी मंडळ शेंदुर्णी,ग्रामस्थ शेंदुर्णी यांचा सहभाग असणार असुन भाविकांनी या जन्मोत्सव सोहळ्यात उदारतेने सहभागी होऊन आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन चालक श्रीरामचंद्र देवस्थान शेंदुर्णी यांनी केले आहे.