भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी निष्काम भक्ती महत्वाची आहे – ह.भ.प.प्रा.डॉ.स्मिताताई अलोणी

5

शेंदुर्णी ता.जामनेर, प्रतिनिधी
परमेश्वराने आपल्याला हा मनुष्य जन्म दिला आहे.आपले परमभाग्य आहे की आपण भगवंताची भक्ती करु शकतो यासाठी निष्काम भक्ती महत्वाची आहे भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्रातील विख्यात कीर्तनकार ह.भ.प.प्रा.डॉ.स्मिताताई अलोणी यांनी केले.
शेंदुर्णीत खान्देशातील विख्यात संतकवि आणि भगवंत् भक्त वै.भीमराव मामा पारळकर यांच्या प्रेरणेने व वै.गोविंदराव पारळकर यांच्या अथक प्रयत्नाने तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू असलेल्या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यात सुरू असलेल्या कीर्तन सप्ताहात त्यांनी आपल्या सुमधुर आवाजात सगळ्यांना मंत्रमुग्ध केले आहे.उत्सवाचे यंदाचे हे १०३ वेळ वर्ष आहे.
श्रीराम मंदिराच्या आवारात सध्या शतकोत्तर परंपरा असलेला श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे.या सोहळ्यात तबल्यावर दिलीप गुरव धुळे तर हार्मोनियम वर गोविंदराव मोकाशी पाचोरा हे साथसंगत करत आहेत.हजारो भाविकांची उपस्थिती लाभत आहे.