मोटर साइकल चोरीच्या आरोपी कडुन सहा मोटर सायकली हस्तगत – पोलीस निरीक्षक सचिन सानप साहेब यांची माहीती

520

प्रतिनिधी शेंदुर्णी ता.  जामनेर – 17/04/2024 रोजी फिर्यादी ईश्वर नामदेव मोहणे रा. मेणगांव ता. जामनेर यांची 30,000/- रु कि.ची एक मोटार सायकल बजाज कंपनीची सीटी 100 काळया रंगाची मो.सा. क्रमांक MH19/BF/3827 काळया रंगाची दिनांक 16/04/2024 रोजी रात्री 00.30 ते 05.00 वा.चे दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरुन नेली बाबत फिर्याद दिल्यावरुन पहुर पोलीस स्टेशन गु.र.नं. 157/2024 भादवि कलम 379 प्रमाणे दाखल करुन गुन्हयाचा तपास सहा. फौजदार  शशिकांत रामदास पाटील यांचे कडेस दिला सदर गुन्हयाचा तपास करतांना सहा. फौजदार  शशिकांत पाटील यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील मोटार सायकल हि कोल्हे ता. पाचोरा येथील राहणारा राजु रामदास माळी याने चोरी केल्याची माहीती मिळाल्यावरुन मा. पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी तपासाचे पथक तयार केले त्यापथकामध्ये पोलीस उप निरीक्षक दिलीप पाटील, सहा. फौजदार शशिकांत पाटील, पोकॉ  प्रशांत बडगुजर, पोकॉ  निखील नारखेडे, पोकॉ विजयकुमार पाटील, पोकॉ  संदीप पाटील पोकॉ  सोमनाथ आगोणे होम. मनोज गुजर, होम निलेश धनगर असे पथक तयार करुन आरोपी यास शिताफीने ताब्यात घेवुन विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने मेणगांव, जामनेर, इत्यादी ठिकाणाहुन चोरी केलेल्या मोटार सायकल बजाज कंपनीच्या सीटी 100 अशा एकुण 06 मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत त्यामध्ये दोन मोटार सायकल भिमराव नारायण पाटील व एक मोटार सायकल आलम अन्वर तडवी रा. कोल्हे ता. पाचोरा याचे कडुन हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधिक्षक जळगाव डॉ. महेश्वर रेडडी , व मा. अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर , चाळीसगांव परिमंडळ तसेच मा.उप विभागीय पोलीस अधिकारी  धनजंय येरुळे पाचोरा विभाग याचे मागदर्शनानुसार पहुर पो. स्टे. चे पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस उप निरीक्षक दिलीप पाटील, सहा. फौजदार  शशिकांत पाटील, पोकॉ  प्रशांत बडगुजर, पोकॉ निखील नारखेडे, पोकॉ विजयकुमार पाटील, पोकॉ  संदीप पाटील पोकॉ  सोमनाथ आगोणे होम. मनोज गुजर, होम निलेश धनगर असे गुन्हयाचा तपास करीत आहेत.