Home देश सूरतमध्ये सहा मजली इमारत कोसळून ७ जणांचा मृत्यू

सूरतमध्ये सहा मजली इमारत कोसळून ७ जणांचा मृत्यू

2

प्रतिनिधी सूरत – ज्या ठिकाणी इमारत कोसळली तिथे मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरफची पथकं कार्यरत आहेत.

सूरतमध्ये सहा मजली इमारत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी ढिगारा उपसण्याचं काम सुरु आहे. काही लोक अडकले असण्याची भीती या ठिकाणी व्यक्त करण्यात येते आहे. गुजरातच्या सूरतमध्ये ही घटना घडली आहे. या ठिकाणी मदत आणि बचावाकार्य सुरु आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ या दोन्हीची पथकं या ठिकाणी कार्यरत आहेत.

घटनेची माहिती मिळताच सूरत महापालिकेचे महापौर दक्षेज मावानी, उपमहापौर नरेंद्र पाटील, भाजपा आमदार संदीप देसाई आणि विरोधी पक्षाच्या नेत्या पायल साकरिया यांच्यासह इतर नेत्यांनीही घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरतमधल्या साचिन भागात सहा मजली इमारत कोसळली. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. मदत आणि बचावकार्य सुरु असून ढिगाऱ्याखाली लोक अडकले असण्याची भीती आहे. आत्तापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.