प्रतिनिधी शेंदुर्णी ता. जामनेर – प्रतिपंढरपूर म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या शेंदुर्णी नगरी मध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी तीन प्रहरात भगवान श्री. त्रिविक्रम महाराज यांचे दर्शन घेतल्यास पंढरपुरच्या पांडुरंगाचेच दर्शन झाल्याचे भाग्य लाभते अशी भाविकांची श्रद्धा असल्याने आषाढी एकादशीला शेंदुर्णी मध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात व यंदाच्या वर्षी आषाढी एकादशी व मोहरम एकाच दिवशी येत असल्याने भाविकांना दर्शन सुलभ व्हावे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नगरपंचायतीचे माध्यमातुन विविध उपाययोजना करण्यात आल्या असुन मंदिर, पोलिस व नगरपंचायत प्रशासन सज्ज झाले आहेत. त्या निमित्त पहूर पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे हे होते. यावेळी प्रास्ताविकात पहुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी पोलिस प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजना जेणे करुन भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे. विविध ठिकाणी बॅरिकेटिंग, वाहनतळाची व्यवस्था, रहदारी नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच गर्दी लक्षात घेता वाढीव पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी अमृत खलसे, सागरमल जैन, नगर पंचायातचे मुख्याधिकारी व प्रशासक साजिद पिंजारी, नबी शहा, ॲड. देवेंद्र पारळकर, सुनील गुजर, शरद बारी, यांनी सूचना मांडल्या अध्यक्षीय भाषणात पाचोरा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी श्री धनजय येरुळे यांनी मार्गदर्शन केले पोलीस प्रशासनाच्या वतीने सगळा बंदोबस्त केला जाईल असे सागितले व यंदाच्या वर्षी आषाढी एकादशी व मोहरम एकाच दिवशी येत असल्याने दोन्ही धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन शांततेत सण साजरे करण्याचे आवाहन केले. आषाढी एकादशीच्या दिवशी आठवडे बाजार बंद राहील तसेच बुधवार चा बाजार गुरुवार रोजी भरणार आहे असे नगर पंचायतच्या वतीने सांगण्यात आले यावेळी सुधाकर बारी, सागरमलजी जैन, शांताराम गुजर श्री. त्रिविक्रम मंदिराचे पुजारी भूषण देवकर, ह. भ. प. कडोबा माळी, फारुक खाटीक, मन्सूर पिंजारी, शेख शकुर, पंकज सूर्यवंशी, भैय्या गुजर, पप्पू गायकवाड, तसेच गावातील नागरिक, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार शेंदुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील यांनी मानले.