प्रतिनिधी शेंदुर्णी ता. जामनेर – शेंदुर्णी येथे संस्थेचा 80 वा वर्धापन दिवस शालेय प्रांगणात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी नव,इमारत उभारणी जमीन पूजन सोहळ्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयरावजी गरुड होते.व प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव म.न.पा.सहाय्यक आयुक्त गणेश चाटे त्याचबरोबर संस्थेचे सचिव सागरमलजी जैन सहसचिव,दादासो यु यु पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसो.दीपकजी गरुड,संचालिका ताईसो.उज्वला काशीद,मा.सचिव सतीशजी काशीद बापूसो सुनील गरुड,के.बी.चौधरी,माजी सरपंच सपकाळ,गोविंद अग्रवाल,डॉ. किरण सूर्यवंशी, सुधाकर अण्णा बारी,शांताराम बापू प्रभारी प्राचार्य शाम सांळुके, उपप्राचार्य व्ही डी पाटील, रघुनाथ माळी प्रभाकर सपकाळ, दीपक पाटील, एस बी निकम, अमृत भवरेदवंगे, नारायण पाटील, सपकाळे सर, ए ए पाटील सर, प्रदीप धनगर
या मान्यवरांच्या उपस्थितीत विद्येची देवता सरस्वती,हरिप्रसाद महाराज,आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड, अण्णासाहेब भास्करराव गरुड,अक्कासो.प्रभावती गरुड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.तद्नंतर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य आर.एस.चौधरी यांनी, कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले प्रास्ताविकात संस्था वर्धापन दिना संदर्भात चौधरी सरांनी सविस्तर माहिती मांडली.
या प्रसंगाचे औचित्य साधून 5 वी ते 12 वी परीक्षेत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी,विद्यार्थिनीं पालक यांचा सत्कार करून बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
तसेच या निमित्ताने संस्थेच्या संचालिका उज्वला ताई काशीद यांनी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना एक मदतीचा हात म्हणून शालेय गणवेश विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना सुपूर्द केले.तसेच संस्थेचे वस्तीगृह सचिव गो. गो.सूर्यवंशी यांनी वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांसाठी वह्या भेट वस्तीगृह सुप्रिटेन्ड, अजय गुजर,विनय गरुड यांना सुपूर्द करण्यात आल्या.
तसेच विद्यार्थी मनोगत घेण्यात आले विद्यार्थी मनोगतात विद्यार्थ्यांनी संस्थेविषयक सविस्तर माहिती मांडण्याचा प्रयत्न करून संस्था वर्धापन दिनाचे महत्त्व सांगितले.
तद्नंतर मान्यवर मनोगतात, विद्यालयाचे माजी शिक्षक व्ही.एन.पाटील यांनी, हरिप्रसाद महाराज यांचा जयघोष करत बापूसाहेबांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच संस्थेचे सचिव सागरमल जैन यांनी बापूसाहेबांसोबत असतानाचा प्रवासातील प्रसंग वर्णन केला एक स्त्री बापूंना बघून जाय पंढऱ्या शायमा हे गाणं म्हणत असायची त्यात बापू सांगायचे की या स्त्रीच्या गाण्यातून देखील ती शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करते असे बापूंच्या लक्षात येई. असे अनेक प्रसंग कथन करत त्यांनी आठवणींना उजाळा दिला तद्नंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांनी यशस्वी होण्याचा गुरुमंत्र देत त्यांनी 18 18 तास अभ्यास करून सुद्धा ते फर्स्ट प्रीलियम मध्ये नापास होतात तरी खचून न जाता सतत किंवा अविरत आपल्या कामाचा ध्यास घेऊन यशाकडे वाटचाल केली पाहिजे असा संदेश देत संस्थेला 11000 रुपयाची देणगी , चाटे साहेबांनी जाहीर केली हा म्हटले की आम्ही सर्व माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळेला किंवा संस्थेला हवी ती मदत करायला तयार आहोत फक्त तुम्ही आवाज द्या अशी साद त्यांनी घातली तसेच येणाऱ्या वर्षात दहावी बारावीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला वडिलांच्या नावाने ट्रॉफी देवू, तसेच गणित विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला चांदीचे पदक देण्याचे त्यांनी कबूल केले त्यानंतर त्यांच्या वडिलांविषयी असलेल्या आठवणींना उजाळा देत सदैव संस्थेच्या ऋणात राहू असा शब्द दिला. त्यानंतर अध्यक्षीय भाषणात संजय दादा गरुड यांनी सर्व प्रमुख पाहुणे व सर्व शाखांचे प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व कार्यक्रमाकार्यक्रमातील मान्यवर सर्वांना संबोधित करत संस्था जशी वयाने वाढते तशीच ती बहरत जाते असं संजय दादा यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले संस्थेत पदाधिकारी येथील जातील परंतु संस्था अमर राहील आणि म्हणून हि वास्तू, दिन दलित गरीब खितपत पडलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच अन्नदानाचे महत्त्वाचे कार्य संस्था करीत आहे. या माध्यमातून विद्यादानम: अन्नदानम: महत्तम या व्यक्तीप्रमाणे संस्था प्रगती करीत असताना दिसत आहे. याप्रसंगी, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.जी.पाटील यांनी केले, पर्यवेक्षक शिरपुरे यांनी आभार मानले तसेच या कार्यक्रम यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक विनोद पाटील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग दिला. शेवटी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.