गरुड महाविद्यालयातील डॉ.दिनेश पाटील वनश्री पुरस्काराने सन्मानित

28

प्रतिनिधी शेंदुर्णी ता. जामनेर –
अप्पासाहेब र.भा.गरुड महाविद्यालय शेंदुर्णी येथील इंग्रजी विभाग प्रमुख व संशोधक मार्गदर्शक तसेच आय.क्यू.ए.सी. समन्वयक म्हणून कार्यरत असणारे प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील यांना महाराष्ट्र शासन वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग समिती धुळे यांच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज- महाराष्ट्र भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदरील पुरस्कार हा मा.शिक्षक पदवीधर आमदार श्री.सुधिरजी तांबे व मा.आमदार श्री.शरद पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ह्या आठवड्यात त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांच्या वृक्ष संवर्धनाच्या कार्याची दखल ही पुरस्कार समितीच्या वतीने घेण्यात आली.डॉ.दिनेश पाटील यांच्या कार्याची दखल म्हणून राज्यशासनाचा रासेयोचा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार सुद्धा त्यांना जाहीर झालेला आहे.
महाविद्यालयात ‘वृक्ष दत्तक’ योजनेच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी पर्यावरण जनजागृतीपर उपक्रमांची आखणी करून एक चांगला संदेश दिला आहे. पुरस्कार मिळाल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब संजयजी गरुड, उपाध्यक्ष श्री.भिमराव शेळके,सचिव सागरमलजी जैन,सहसचिव यु.यु.पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब दिपकजी गरुड, श्री.प्रवीण भाऊ गरुड,प्राचार्य डॉ.श्याम साळुंखे यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.