बीड (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना (बामुक्टो) च्या केंद्रीय कार्यकारिणी ची बैठक आज येथे संपन्न झाली. यासाठी बीड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्काऊट गाईड भवन, बीड येथे संपन्न झालेल्या या बैठकीमध्ये प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करुन ‘बामुक्टो’ च्या बीड जिल्हा कार्यकारिणी ची निवड करण्यात आली.
यावेळी ‘बामुक्टो’ च्या बीड जिल्हा अध्यक्ष पदी प्रा. डॉ. रामहरी मायकर, सचिव पदी प्रा. रामहरी काकडे, उपाध्यक्ष पदी प्रा. डॉ. दत्ता नरसाळे व प्रा. डॉ. मुंजाभाऊ कव्हळे, सहसचिव पदी डॉ. उषा माने, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख प्रा. रमेश रिंगणे यांची तर सदस्य म्हणून प्रा. डॉ. तन्वीर पठाण, प्रा. डॉ. रामकृष्ण प्रधान, प्रा. डॉ. लक्ष्मण चव्हाण, प्रा. डॉ. शांता जाधवर/गीते यांची निवड करण्यात आली. प्रा. डॉ. अताऊल्ला जहांगीरदार, प्रा. डॉ. मदन शिंदे व प्रा. डॉ. ज्ञानेश्वर वैद्य यांची ‘बामुक्टो’ बीड जिल्हा मार्गदर्शक पदी निवड करण्यात आली.
यावेळी ‘बामुक्टो’ च्या केंद्रीय कार्यकारिणी चे विभागीय अध्यक्ष प्रा. डॉ. बप्पासाहेब मस्के, सचिव प्रा. डॉ. मारोती तेगमपुरे, डॉ.बा.आ.म. विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रा. डॉ . उमाकांत राठोड, ‘बामुक्टो’ चे संभाजीनगर जिल्हा सचिव प्रा. डॉ. दिलीप बिरुटे, ‘बामुक्टो’ चे जालना जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉ. शफी शेख, मराठवाडा शिक्षक संघाचे महासचिव राजकुमार कदम, आजबे, कालिदास धपाटे, जी. डी. तांदळे व जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.