मनशक्ती प्रयोग होणे काळाची गरज संजय दादा गरुड यांचे प्रतिपादन धि.शेंदुर्णी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लि. शेंदुर्णी संचलित

42

शेंदुर्णी – आ.ग.र.गरूड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथे मनशक्ती प्रयोग शिबिराचे आयोजन करण्यात आले, याप्रसंगी संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयरावजी गरूड हे अध्यक्षस्थानी होते त्यांच्या समवेत संस्थेचे सचिव काकासो सागर मलजी जैन,सहसचिव दादासो यु यु पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मनशक्ती प्रयोग शिबिर प्रसंगी चेअरमन संजय दादा गरुड यांनी मनशक्ती प्रयोगासंदर्भात मत व्यक्त करताना सांगितले की, काळ हा भयानक आहे येणाऱ्या काळात मुलांवर जर नीतीमूल्य रुजवायचे असतील तर मनाचे प्रयोग होऊन मनशांतीच्या दिशेने विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवून त्यांचा आत्मिक, शारीरिक विकासा बरोबरच बौद्धिक विकास व्हावा व समाजात नीती मूल्यांची रुजवून होऊन भावी पिढीचे सक्षम नागरिक या भावी पिढी मधून घडावेत या उद्देशाने अशा पद्धतीचे मनशक्ती प्रयोग होणे काळाची गरज असल्याचं त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले, मनशक्ती प्रयोग केंद्राचे प्रमुख ज्येष्ठ साधक शंतनू पटवे, अनिल अत्तरदे अशोक निकम,डॉक्टर गिरीश पाटील, डॉक्टर सौ उज्वला भिरूड, राजेश येवले,विजय जोशी,डॉक्टर देशपांडे, या मान्यवरांनी मनशक्ती प्रयोगाची ईतंभूत अशी माहिती दिली. कार्यक्रमाच्या, उद्घाटना नंतर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चौधरी यांनी आपले प्रास्ताविक केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.जी.पाटील यांनी केले, या कार्यक्रमास पर्यवेक्षक शिरपुरे, पर्यवेक्षक विनोद पाटील यांची उपस्थिती होती. या निमित्ताने विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना या मनशक्ती प्रयोग कार्यक्रमाचा येणाऱ्या काळात निश्चितच लाभ होईल अशा भावना विद्यार्थी वर्गांमधून व्यक्त झाल्या या कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर यांनी प्रयत्न केले.