गरुड विद्यालयात टिळक पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे,आबासाहेब काशिनाथराव गरुड जयंती साजरी

40

शेंदुर्णी – आ.ग.र, गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच अण्णाभाऊ साठे व संस्थेचे उद्धारक आबासाहेब काशिनाथराव गरुड यांची जयंती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शालेय प्रांगणात साजरी करण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य/ मुख्याध्यापक आर.एस.चौधरी सर होते तर यानिमित्ताने विद्यार्थी मनोगत योजना बारी, सेजल पाटील, स्वप्निल माळी, श्रद्धा विसपुते, श्रद्धा बडगुजर, दिव्या भालेराव, तेजस्विनी गवळी,खुशी काबरा, नयन तुके इत्यादी, विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तदनंतर विद्यालयाचे शिक्षक एल पी मोहणे सरांनी अण्णाभाऊंच्या जीवन चरित्रावर तसेच आबासाहेब काशिनाथराव गरुड व लोकमान्य टिळक यांच्या जीवन चरित्राचा आढावा घेतला. नंतर विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी सर यांनी या तिघा विभूतींबद्दल माहिती देताना,बरीच उदाहरण देऊन, महापुरुषांचे महत्त्व सांगितले व आपण या महान विभूतींच्या विचारधारेचा स्वीकार करावा असे आवाहन केल.