गरुड विद्यालयात पालक शिक्षक सभा संपन्न

42

प्रतिनिधी शेंदुरनी….आ.ग.र गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथे पालक शिक्षक सभेचे आयोजन गरुड पतपेढी शेंदुर्णी येथे करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयरावजी गरुड हे अध्यक्षस्थानी होते. प्रथम आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड, ह.भ.प.हरिप्रसाद महाराज,कै.अण्णासाहेब भास्करराव गरुड तसेच सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. तद्नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस. चौधरी सर यांनी केले प्रास्ताविकात सरांनी सविस्तर माहिती देत विद्यालयात वेगवेगळे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविले जातात. तसेच वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देखील राबवण्यात येतात. विद्यार्थी प्रत्येक परीक्षेमध्ये हिरीरीने सहभाग घेतात. तसेच पालकांनी पालक म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असतांना विद्यार्थी कुठे चुकीच्या दिशेने जात तर नाही ना म्हणून लक्ष दिले पाहिजे तसेच अति मोबाईलचा वापर किंवा व्यसनाधीनतेकडे आजच्या तरुण पिढीची होत असलेली वाटचाल दिसून येते,तरी पालकांनी स्वतः देखील व्यसनमुक्त व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

तद्नंतर संस्थेचे सचिव काकासाहेब सागरमलजी जैन यांनी देखील आपले विचार मांडले तसेच सहसचिव दादासो यु.यु. पाटील यांनी आपल्या मनोगतात पालक शिक्षक या दोघ घटकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाकडे लक्ष द्यावे असे संबोधित केले तसेच पालक वर्गातून डॉक्टर निलम अग्रवाल यांनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय संदर्भात समाधान व्यक्त करून सांगितले की आज सी.बी.एस्सी च्या शाळा जरी असल्या तरी सुद्धा आपल्या गरुड विद्यालयातील शिक्षक मेहनत घेतात त्याचेच फलित म्हणून आज माझी मुलगी व मुलगा किंवा इतर बांधवांचे पाल्य देखील या आधुनिक युगात तग धरून आहेत.हे लक्षात येते.शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय दादा गरुड यांनी सर्व सभेला संबोधित करीत पालकांच्या काही अडचणी असतील तर निश्चित सांगाव्या असं आवर्जून पालकांना देखील सांगितले व शिक्षकांकडून शैक्षणिक विकासाबरोबर आनंददायी शिक्षण घडावे या अपेक्षा व्यक्त केल्या.या निमित्ताने पालक शिक्षक संघाची कार्यकारणी घोषित करण्यात येऊन या कार्यक्रमाचे औचित्य साधून काकासो.सागरमलजी जैन यांची जैन समाज अधिपती म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला व ए पी आय नंदकुमार शिमरे साहेब यांचा देखील सत्कार करण्यात आला.संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बरेचसे मान्यवर उपस्थित होते. ए. पी. आय नंदकुमार शिमरे साहेब, प.स.सदस्य डॉ किरण सूर्यवंशी,सुधाकर अण्णा बारी, किरण सूर्यवंशी,व प.स.सदस्य उपाध्यक्ष शांतारामजी गुजर,दिलीप फकीरा,योगेश बारी नगरसेवक पती, दादासो.ए.ए.पटेल, डॉक्टर नीलम अग्रवाल, भीमराव पाटील, विनोद पाटील, श्रीमती यशोदा रामा सुतार, नीता चौधरी,किरण माळी,भूषण देवकर, पालक शिक्षक संघ सचिव एस.बी.पाटील इत्यादी मान्यवरांसोबत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक व्ही.एम.शिरपुरे, पर्यवेक्षक विनोद पाटील, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यानिमित्ताने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी जी पाटील यांनी केले तर आभार पर्यवेक्षक व्ही एम शिरपुरे यांनी मानले.