IMG_3384 शेंदुर्णी ता. जामनेर प्रतिनिधी – शेंदुर्णीकरांची कित्येक वर्षापासून ची मागणी अखेर पूर्ण होणार असून शिवस्मारक पुतळा च्या कामात लवकरच सुरुवात होणार असून जनतेत आनंदाची लाट पसरली आहे.
शेंदुर्णीत शिवस्मारक पुतळा होत नसल्याने शिवप्रेमी मध्ये खंत व्यक्त केल्या जात होती. परंतु या बाबतीत ग्रामविकास मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या पुढाकाराने गोविंदभाई अग्रवाल, अमृत खलसे व संजयदादा गरुड, शरद बारी आदींनी पाठपुरावा केल्यामुळे जागा निश्चिती होऊन संबंधित आर्किटेक्चर अधिकारी यांनी जागेची निश्चिती करून, मोजमाप करून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले.
यावेळी शिवस्मारकाचा संकल्प चित्र ही पत्रकारांना देण्यात आले.
यावेळी बोलताना भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोविंदभाई अग्रवाल यांनी सांगितले की पाचोरा जामनेर रोडवरील फळ विक्री सहकारी संस्थेच्या व्यापारी संकुला समोरील खुल्या जागेत शिव पुतळ्याचे काम होणार असून सदर संस्थेने 2000 स्के फूट जागा ही बक्षीस पत्र करून देण्याचे जाहीर केले आहे .
शेंदुर्णी प्रवेशद्वारावरच महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा होत असल्याने शिवप्रेमी व नागरिकात आनंदाची लाट उसळली आहे.
त्याचबरोबर भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाची ही काम तात्काळ सुरू होत असल्याची माहिती यावेळी मिळाली.
यावेळी नगर पंचायत प्रशासक विलास धाडे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोविंदभाई अग्रवाल , अमृत खलसे , संजयदादा गरुड , शरद बारी अभियंता सुजित वर्मा माजी उपनगराध्यक्ष निलेश थोरात , शंकर बारी , पप्पू भाऊ , योगेश बारी , सागर ढगे, सह इतर माजी नगरसेवक ग्रामस्थ शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.