शेंदुर्णी जामनेर – आ.ग.र.गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथे,जामनेर तालुकास्तरीय मैदानी क्रीडा घेण्यात येत आहेत. या शासकीय क्रीडा स्पर्धा उद्घाटन प्रसंगी संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयरावजी गरुड अध्यक्षस्थानी होते,उद्घाटक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आर्किटेक रविकुराम,संजय पाटील संस्थेचे सचिव सागरमलजी जैन, सहसचिव दादासाहेब यु यु पाटील, संस्थेचे वस्तीगृह सचिव ग.गो सूर्यवंशी माजी पंचायत समिती सदस्य सुधाकर अण्णा बारी,माजी.पंचायत समिती सदस्य शांताराम बापू गुजर,माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर किरण सूर्यवंशी, तालुका समन्वयक आसिफ खान,जी.सी पाटील,प्राध्यापक समीर घोडेस्वार,पत्रकार बांधव युवराज सूर्यवंशी,विलास अहिरे,डी.के.पाटील,डी आर पाटील,व्ही एन पाटील,अनिल पाटील, सुनील चौधरी,डी आर चौधरी, एस टी मोजे,प्रवीण पाटील हरिभाऊ राऊत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्याम साळुंके,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.चौधरी,उप-प्राचार्य व्ही.डी.पाटील,पर्यवेक्षक व्ही.एम.शिरपुरे,पर्यवेक्षक विनोद पाटील तसेच क्रीडा शिक्षक प्राध्यापक महेश पाटील, बी.एम.कुमावत,पी.पी.पाटील, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन सोहळा पार पडला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चौधरी यांनी केले तसेच मार्गदर्शन पर भाषण संस्थेचे सचिव सागर मलजी जैन यांनी केले. शेवटी अध्यक्षीय भाषणात,संजय दादा गरुड यांनी खेळ खेळतांना कुठलीही द्वेषबुद्धी न ठेवता खेळाडू वृत्तीने व विनोद बुद्धीने जय पराजय पचवता यावा.असे मार्गदर्शनपर अध्यक्षीय भाषणा मनोगत व्यक्त केले.या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग नोंदवला.या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी सहभाग नोंदवत सहकार्य केले.