शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – शेंदुर्णीत दहीहंडी चे चाळीसाव्या वर्षी मोठ्या हर्षवल्ला साथ जल्लोषात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम सार्वजनिक दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने करण्यात आला.
यावेळी दहीहंडीचे विधिवत पूजन शिवसेना जिल्हाप्रमुख दीपक राजपूत,भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल,अमृत खलसे, डॉ.नीलम कुमार अग्रवाल,श्रीपाद विसपुते,डॉ विजयानंद कुलकर्णी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यानंतर दहीहंडी फोडण्याची सुरुवात गोपाळपूर येथील मंदिरापासून झाली कृष्णाचे भजन गीत गात दहीहंडीची मिरवणूक गोपापुरी,वाडी दरवाजा,गांधी चौक,चंचल जनरल स्टोअर,पारस चौक, धनगर गल्ली,कुमावत गल्ली, लोकमान्य टिळक चौक,पहूर दरवाजा,हनुमान मंदिर दहीहंडी करीत पहूर दरवाजा चौकात मानाच्या दहीहंडी फोडण्याचा उत्सव साजरा करीत दहीहंडीची सांगता झाली.
दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने शिवसेना शहर प्रमुख संजय सूर्यवंशी,युवा सेना अधिकारी अजय भोई,बारकू जाधव,युवराज बारी,अशोक बारी, शंकर बारी. शरद बारी, भूषण बडगुजर,संदीप बारी,विशाल शिंपी,तुकाराम बारी व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
मुस्लिम बांधवांकडून दहीहंडी उत्सव समितीचा सत्कार करण्यात आला .
दहीहंडी मुस्लिम भागातून जात असताना दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने मुस्लिम बांधवांचा ही यावेळी सत्कार करण्यात आला .