शेंदुर्णी :- येथील सूर्यवंशी गुजर समाजसेवा मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे दि 24 रोजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला होता, यात इयत्ता पहिली पासून पदवीपर्यंत तर व्यवसायिक शिक्षणासह इतर विषयात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सामाजिक गौरव केला जातो ,
यंदा गुजर समाजातील इयत्ता दहावी मध्ये तालुक्यातून सर्वप्रथम आलेली विद्यार्थिनी कुमारी मेघा सचिन गुजर हिचा विद्यार्थ्यांच्या आई सह विशेष गौरव मंडळाच्या वतीने करण्यात आला या वेळी समाज बांधव-भगिनी मोठ्याप्रमाणावर हजर होते
विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून सरस्वती विद्या मंदिराचे मुख्याध्यापक राजेन्द्र नामदेव पाटील हे होते,मंचावर उपस्थित शांताराम बापू गुजर ,डॉ पंकज सूर्यवंशी, डॉ यशवंत सूर्यवंशी,विठ्ठल महाराज,राजू गुजर,एड धर्मराज सूर्यवंशी, महेंद्र गुजर समाज मंडळाचे सचिव रवींद्र सूर्यवंशी उपस्थित होते .
गुणगौरव समिती प्रदीप गुजर अविनाश गुजर ,भैयाभाऊ सूर्यवंशी (उपाध्यक्ष समाज मंडळ) यांच्या सूचनेप्रमाणे सरदार मंडळाचे अध्यक्ष अक्षय गुजर हर्षल, दिलीप गुजर (सहसचिव)कुणाल सुभाष पाटील कुणाल दिलीप पाटील (नवयुवक मंडळ उपाध्यक्ष) अभिजीत मिलिंद गुजर,शैलेंद्र सुकलाल गुजर (सचिव)
सर्व सदस्यांनी याबाबत मेहनत घेतली सूत्रसंचालन समाज मंडळाचे अध्यक्ष सुनील गुजर(पत्रकार) तर आभार रवींद्र सूर्यवंशी यांनी मानले.