प्रतिनिधी पहुर – पो स्टे पहुर येथील अधिकारी अंमलदार यांनी आज रोजी दुपारी 12:00 वाजेचे सुमारास अंबाडी धरण परिसरात छापा टाकून इसम नामे विनोद हुसेन तडवी व कबीर शेखलाल तडवी दोन्ही राहणार चिलगाव यांच्या मालकीचे अवैध बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी तयार करण्याकरीता वापरण्यात येणारे अंदाजे 1600 लिटर कच्चे रसायन किंमत रुपये 35000/- हे जागीच नाश करण्यात आले. वर नमूद इसमान विरुद्ध दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाही पोस्टेचे पोलीस निरीक्षक सचिन सानप साहेब यांचे मार्गदर्शना अंतर्गत पी एस आय श्री भरत दाते, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण पाटील, पोलीस अमलदार विनोद देशमुख, राहुल पाटील, ज्ञानेश्वर ठाकरे ,गोपाल गायकवाड, विजय पाटील यांनी पार पाडली..