कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यावर कठोर शासन करण्यास पोलीस सक्षम आहे – पोलीस निरीक्षक सचिन सानप पो . स्टे . पहुर

15

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी –

दोन्ही गटाचा पोलीस स्टेशनवर मोर्चा.
बुधवारी रात्री झालेल्या दगडफेकीनंतर दोन्ही जमावातील तरुणांना पोलिसांनी आरोपी केले व काहींची धरपकड करून त्यांचा शोध घेऊन त्यांना जमा केले.
त्यानंतर काल सकाळी कोळीवाडा व परिसरातील शेकडो महिला व पुरुष यांनी पोलिसावर मोर्चा नेत आमच्यावर अन्याय होत असल्या मुळे न्याय मिळावा ही मागणी केली. दोषी वर कारवाई करावी ही मागणी केली.
त्यानंतर इस्लामपुरा भागातील महिला व पुरुषांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा नेत आमच्यावर अन्याय होऊ नये.आरोपींना शासन करावे ही मागणी लावून धरली.
रात्रीच्या दगडफेकी नंतर शेंदुर्णीत जनजीवन पूर्वपदावर.
शेंदुर्णी येथे बुधवारी रात्री दहा वाजता दोन गटात झालेल्या दगडफेकीनंतर तणाव निर्माण झाला होता परंतु पोलीस अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून जनजीवन सकाळी पूर्वपदावर आणले परिस्थिती नियंत्रणात असून वरिष्ठ पोलीस अधिकारी शेंदुर्णी तळ ठोकून आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दोन मुलांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसण इस्लामपुरा व कोळीवाडा येथील दोन गटात दगडफेकीत झाले त्यात दोन्ही गटातील बरेच जण जखमी झाले .वाहनांचे ही नुकसान झाले. पोलिसांनी लागलीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे हे घटनास्थळी स्थळ ठोकून आहेत. त्यांचे सोबत पोलीस निरीक्षक सचिन नंदकुमार शिंमरे व इतर पोलीस अधिकारी पोलीस कुमक मोठ्या प्रमाणात बंदोबस्तात आहे.
24 आरोपींची ओळख पटली असून इतरही 20 ते 25 जण अज्ञात आहेत. त्यापैकी 12 जणांची रात्री धरपकड करून जमा करण्यात आले.
सदर आरोपी विरोधात पहुर पो. स्टे. येथे भादवी कलम109,110,189(2),191(2),191(3),190,324(4) नुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.
“शेंदुर्णीत आगामी सण उत्सव गणेशोत्सवाच्या काळात शेंदुर्णी चौख बंदोबस्त राहणार असून भाविकांनी उत्सव आनंदाने साजरा करावा कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यावर कठोर शासन करण्यास पोलीस सक्षम आहे. तसेच अफवावर कोणीही विश्वास ठेवू नये असे कर्तव्यदक्ष पो.  नि. सचिन सानप यानी सागीतले आहे .