शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – जळगावात नुकतीच एक ‘नवरीचा मेकअप ‘स्पर्धा घेण्यात आली. यात सर्वोत्कृष्ट मेकअप करून नवरीला सजवणाऱ्या शेंदुर्णी च्या संध्या सूर्यवंशी यांच्या प्रथम क्रमांक आला. यात 60 महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगावला नुकतीच एक नवरीचा मेकअप अशी स्पर्धा घेण्यात आली. या तब्बल 60 ब्युटी पार्लर महिला चालकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आयोजन आमदार सुरेश भोळे, महावीर ज्वेलर्स व आदींनी केले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून समीर साळवा,घनश्याम गंधधारा,संजय भाटिया, प्रियंका दिवटे, अनुप्रीत बक्षी, रीना सराफ आधी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मेकअप आर्टिस्ट उपस्थित होते.
शेंदुर्णीच्या संध्या गणेश सूर्यवंशी यांना सर्वप्रथम क्रमांकाचे सन्मानित करण्यात आले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांना 21 हजार रुपये रोख चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना संध्या सूर्यवंशी यांनी सांगितले की ‘शेंदुर्णीच्या पांडे नगर मध्ये माझे शैलजा ब्युटी पार्लर आहे. प्रत्येक नवरी मुलीला असे वाटते की लग्नात आपण आकर्षक दिसावे, आमचाही हाच प्रयत्न असतो. नवरी मुली अधिक अधिक कशी सुंदर दिसावी याच प्रयत्नातून मला हा पुरस्कार मिळाला. गणेश सूर्यवंशी हे माझे पती असून मनोरथ रोलिंग शटर्स नावाचे दुकान आहे. माझे सासरे सुधाकर सूर्यवंशी यांनीही सदर पुरस्कार मिळवण्यासाठी मला प्रेरणा दिली.’
त्यांच्या या यशाबद्दल शेंदुर्णीतील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.