राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे माजी जिल्हा अध्यक्ष सागर गरुड उद्या भाजपा प्रवेश करणार. उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश सोहळा होणार

34

प्रतिनिधी शेंदुर्णी ता जामनेर –  राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे माजी जिल्हाध्यक्ष सागर गरुड शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी प्रवेश करणार असल्याचे डॉ सागर गरुड यांनी कळविले आहे.
वैद्यकीय क्षेत्रात आघाडीत असलेले पाचोरा,जामनेर, भडगाव तालुक्यात प्रस्त असलेले डॉ. गरुड हे उद्या मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहे. त्यांचे सोबत विविध सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी सुद्धा पक्ष प्रवेश करणार आहे.
तेथून आल्यानंतर जामनेर पाचोरा तालुक्यातील अनेक कार्यकर्ते माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहे.आरोग्य सेवेच्या माध्यमातून डॉ. गरुड यांची तरुणांची मोठी फळी दोन्ही तालुक्यात त्यांनी जोडलेली आहे. त्यांना मानणारा गट जामनेर मतदार संघात मोठ्या प्रमाणात आहे.प्रत्येकाच्या सुखा दुःखात,अडीअडचणीच्या वेळी मदतीला धावून जाणारे डॉ. गरुड अशी त्यांची ख्याती आहे.त्यांच्या भाजप प्रवेश यामुळे भाजपला आणखी पुन्हा बळकटी प्राप्त होणार असल्याचे बोलले जात आहे. पक्षप्रवेशानंतर त्यांच्यावर पक्ष मोठी जबाबदारी टाकली जाणार असल्याची ही खात्री लायक वृत्त आहे.