शेंदुर्णी गरुड विद्यालयात टी.डी. लसीकरण मोहीम संपन्न

36

शेंदुर्णी – आ.ग.र.गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथे,5 ऑक्टोबर शनिवारी इयत्ता10 वीच्या विद्यार्थ्यांना टी.डी.लस देण्यात आली याप्रसंगी आरोग्य सहाय्यीका राजश्रीपाटील, छाया देशमुख,अंकिता निमसडकर,(जे.एन.एम.)नैना रंगारी(जे.एन.एम.)
शुभांगी हिवाळे (जे.एन.एम.) तेजस्विनी मुन (जे.एन.एम.) यांनी लसीकरण केले याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर एस चौधरी, व्ही डी पाटील, पर्यवेक्षक व्ही एम शिरपुरे, पर्यवेक्षक विनोद पाटील यांच्या समवेत सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यानिमित्ताने सर्व परिचारिका,आरोग्य सहाय्यिका,जि.एन.एम. यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी या सरकारी योजनेचे तोंड भरून कौतुक करत समाधान व्यक्त केले.