प्रतिनिधी पहुर ता. जामनेर – पोस्टे पहुर हद्दीत दि. 16/10/24 रोजी सायंकाळी 19:00 वाजेचे सुमारास पहूर- जळगाव रोडवर लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान कार क्रमांक MH20-EE-3097 ही चेक केली असता ड्रायव्हर नामे- दिलीप अशोक पाटील, राहणार- धुळे हा किंमत रुपये 1,25,430/- ची देशी विदेशी दारू वाहून घेऊन जाताना (एकूण मुद्देमाल किंमत रुपये- 7,75,430/-) मिळून आल्याने त्याचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये पहुर पो. स्टे. येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, विधानसभा इलेक्शन ची आचार सहिता लागू झाल्याने नाका बंदी करुण वाहने तपासून कार्यवाही करण्याचे जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी साहेब यांचे आदेश असल्यामुळे सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भाग धनंजय येरुडे साहेब व पहुर पो. स्टे. चे कर्तव्यदक्ष पो. नि. सचिन सानप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी यानी केली आहे.