प्रतिनिधी – प्रति पंढरपूर शेंदुर्णी नगरीमध्ये दुर्गा विसर्जन उत्साहात संपन्न झाले गावातील विविध दुर्गा मंडळांनी ढोल ताशांच्या गजरामध्ये डीजेच्या तालावर दुर्गा देवीची मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीतील विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे लोकप्रिय दुर्गोत्सव मित्र मंडळाची मिरवणूक अतिशय शिस्तबद्ध काढण्यात आली त्यांनी सादर केलेला एकवीरा देवीचा देखावा देवीच्या भूमिकेत सौ सपना सूर्यवंशी व कथकली च्या भूमिकेत अजय चौधरी यांना सजविण्याचे काम सौ सारिका सूर्यवंशी महिमा ब्युटी पार्लर यांनी केले तसेच महिलांचे लेझीम पथक व टाळ पथक मिरवणुकीचे आकर्षण ठरले तसेच समाजात चांगल्या काम करणाऱ्या पतसंस्था व देणगी देणाऱ्या भक्तांना आभार पत्र मंडळाच्या वतीने देण्यात आले तसेच मिरवणुकीतील भक्तांना अग्रवाल परिवाराच्यावतीने खिचडीचे व राजू भावसार यांनी पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पाचोरा विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप व शेंदुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंबरे यांच्या सहकाऱ्यांनी चोक बंदोबस्त ठेवला.