जामनेर विधान सभा मतदारसंघातील लोहारा, खर्चाणे, शेंदूर्णी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात डॉ.सागरदादा गरुड यांच्या मार्गदर्शना खाली मा. ना. गिरीषभाऊ महाजन ,संजयदादा गरुड , गोविंद शेठ अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत शेंदूर्णी येथे प्रवेश केला. काही महिन्यांपूर्वी शेंदुर्णीतील जेष्ठ नेते मा.श्री.संजदादा गरुड यांच्या पक्ष प्रवेशानंतर डॉ.सागरदादा गरुड काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष होते. अखेर नुकताच डॉ.सागर गरुड यांनी भा.ज.पा.त प्रवेश करून संजयदादा व सागरदादा “हम साथ-साथ है” हे दाखवून दिले.
त्या पार्श्वभूमीवर जामनेर तालुक्यातील व पाचोरा तालुक्यातील संजयदादा व सागरदादा यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज शेंदुर्णी येथे ग्रामविकास मंत्री मा.ना.श्री.गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या प्रसंगी गोविंदशेठ अग्रवाल, विलासभाऊ राजपूत, अमृतबापु खलसे, पंडितराव जोहरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी गिरीशभाऊंना सर्वाधिक विक्रमी मतांनी निवडून आणू असे डॉ. सागरदादा गरुड यांनी कार्यकर्त्यांशी बोलतांना सांगितले.