दि. 22/10/24 रोजी संध्याकाळी शेंदुर्णी या ठिकाणी नाकाबंदी दरम्यान एका मोटरसायकलवर दोन इसम काहीतरी संशयास्पद रित्या घेऊन जाताना मिळून आले. त्यांची सखोल चौकशी व पडताळणी केली असता इसम नामे- 1)वीरमदेव परमा राठोड वय 25 वर्ष 2) पिनू सिताराम चव्हाण वय 28 वर्षे दोघेही राहणार -लिहेतांडा, तालुका जामनेर हे गांजाची वाहतूक करत असल्याचे आढळले. त्यांचे ताब्यात 3.120 kg गांजा व मोटार सायकल असा एकूण 1,12,000/-रुपये किमतीचा मुद्देमाल मिळवून आला आहे. संबंधिताविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सानप यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय श्री भरत दाते, पीएसआय श्री नंदकुमार शिंब्रे,पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण पाटील, दीपक सुरवाडे ,पोलीस अंमलदार विनोद पाटील, सागर गायकवाड, विजयकुमार पाटील, प्रशांत बडगुजर, गुलाब पवार इत्यादींनी पार पाडली. अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.