प्रतिनिधी शेंदुर्णी ता. जामनेर – शेंदुर्णी नगर नगरपंचायती मध्येच घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसत होते व शेंदुर्णी नगरपंचायत च्या प्रवेशद्वाराजवळ नागरिकांसाठी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या बैठक आसनाजवळ भिंतीवर गुटखा खाऊन थुकुन थुकुन घाण केलेली दिसत होती , मुतारी चा वास येत होता कार्यालयीन आवारात ठिक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले होते म्हणून सामाजिक कार्यकर्ते फारुक खाटीक यानी जिल्हाधिकारी साहेब यांच्या कडे तक्रार केली होती व त्याची स्टार एटीन न्यूज वर एक बातमी प्रकाशित झाली होती बातमी वाचून मुख्याधिकारी विवेक धांडे साहेब म्हणाले होते की , मला काहीच फरक पडत नाही वैगरे परंतु शेवटी त्याची दखल शेंदुर्णी नगर पंचायतचे मुख्याधिकारी विवेक धांडे साहेब यानी घेतली असून नगरपंचायत मध्ये स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झाली आहे कलर काम सुरू आहे हे सर्व काम पाहून नागरिकांनी सामाधान व्यक्त केले असून मुख्याधिकारी विवेक धांडे साहेब यानी …………. दुरुस्ती करावी .