महावितरण विभागाकडून शेंदुर्णी साठी विशेष वसुली पथकाची नियुक्ती , शेंदुर्णी विभागाची एकूण थकबाकी एक कोटी रुपयांच्या घरात

16

शेंदुर्णी – 
महावितरण विभागाचे वाढते विजेचे जाळे सोबतच येणाऱ्या समस्यांना तोंड देवून ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळावी त्यासाठी महावितरण विभाग नेहमी तत्परतेने अहो रात्र उभे असते मात्र अधिकच्या थकबाकी मुळे त्या विभागाला अपूर्ण मनुष्य बळामध्ये थकबाकी वसुली करावी की ग्राहकांना सेवा द्यावी। यासारख्या मोठ्या समाश्यांना समोरे जावे लागते.शेंदुर्णी महावितरण विभागाची एकूण थकबाकी एक कोटी रुपयांच्या जवळपास पोचली असून महावितरणाच्या वरिष्ठ कार्यालया कडून शेंदुर्णी विभागाकडील असलेली थकबाकी वसुली साठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली असून शेंदुर्णी कक्षाचा अतिरिक्त पदभार असलेले सहाय्यक अभियंता प्रवीर बोदेले यांच्या मार्गदर्शना खाली सबंधित पथकामध्ये मुख्य तंत्रज्ञ संजय राजपूत जोती नागरे तसेंच राजेश सोळंकी,मेहुल बरडे,प्रवीण राजपूत,योगेश नाईक,राजेश राठोड,सुनील राठोड,मनोज बारी, आदींचा समावेश असून मदतीसाठी ज्ञानेश्वर निकम,मोहित पाटील,विजय भगत, हे असणार आहेत .