शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – शेंदुर्णी औस्ट पोस्ट स्टेशन समोरील ललवाणी प्रोविजन व पाटील कृषी केंद्रत रात्री चोरट्यांनी शटर वाकून धाडसी चोरी केली. गुरख्याच्या प्रसंगावदानामुळे मोठी चोरी टळली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की काल भल्या पहाटे पावणे चार वाजता चोरट्यांनी पाटील कृषी सेवा केंद्र येथे शटर वाकून चोरी केली. त्यात त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. त्यानंतर त्याच्या बाजूला असलेल्या लालवानी प्रोविजन जवळ त्यांनी आणलेली बोलेरो जीप गाडी उभी करून त्या दुकानातील काउंटर मधील दहा ते पंधरा हजार रुपये रोख व काजूचे व ड्रायफूट च्या गोण्या गाडीमध्ये टाकू लागले. त्याचवेळी गस्तीवर असलेला गुरखा बिरबल राणा यांनी पाच ते सहा जणांचे टोळके दुकानातून काहीतरी काढून गाडी ठेवत असल्याचे लक्षात आले. अगोदर त्याला वाटले दुकानदारांनी काही माल आणून दुकानात ठेवत असेल,परंतु बाजूच्या दुकानाचे वाकलेले शटर पाहून त्याच्या लक्षात हे चोरटे असल्याचे लक्षात आले व त्यांनी सिटी मारणे सुरू केले. ताबडतोब तेव्हा चोरट्यांनी एक दोन गोणी ड्रायफ्रूटच्या गोणी सह पोबारा केला. प्रसंगावधान राखून गुरख्यांनी दुकान मालकाला फोन करून बोलवले व चोरीचा प्रकार उघडकीस आला.त्यानंतर दुकानदारांनी 112 वर कॉल करून पोलिसांना बोलाविले.
शान पथक, फॉरेन्सिक पथक, ठस्याचे पथक येऊन गेले. पुढील कारवाई पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप व शेंदुर्णी आऊटपोस्टचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिमरे करीत आहे. शेंदुर्णी पोलिसांना आव्हान:
शेंदुर्णी आऊट पोस्ट च्या अगदी समोर दुकानात धाडसी चोरी झाली. यामुळे चोरट्यांनी पोलिसांना आव्हानच दिले असे बोलल्या जात आहे. याबद्दल पोलिसांच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शेंदुर्णी आऊट पोस्टला नवीन जीप गाडी, ड्रायव्हर व अधिक कुमक मिळावी. रात्री पोलिसांची गस्त व्हावी. 24 तास पोलीस स्टेशनला पोलीस कर्मचारी उपस्थित असावे अशी मागणी होत आहे.
रात्री पोलिसांची गस्त असावी. शहरांत पोलिसांनी चक्कर मारावी. Cctv यंत्रणा कार्यरत असावी. भय मुक्त वातावरणात व्यापार करता यावा.