शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – येथील पाचोरा रोडवरील मोरया हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर श्री मंगल सिंग परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर व अल्प दरात रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तरी गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन मोरया हॉस्पिटल परिवार ने केलेले आहे.
मोरया हॉस्पिटल शेंदुर्णी व वृंदावन हॉस्पिटल पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्यमान प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर महाआरोग्य शिबिर अभियान 27 मार्च गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजेपासून ते बारा वाजेपर्यंत राहील.यात डॉ. योगेश तेली,एमडी,आयुर्वेदिक, नाडी वैद्य.
डॉक्टर राजेंद्र पवार बी ए एम एस पुणे.
डॉ विजय पाटील स्त्री रोग.
डॉ नीलकंठ पाटील अस्थिरोग तज्ञ.हे आपली सेवा देणार आहेत.
सदर शिबिर मोरया हॉस्पिटल, शगुन पेट्रोल पंप समोर, पाचोरा रोड,शेंदुर्णी येथे होणार आहेत तरी गरजू रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा.
शुगर तपासणी 150 रुपये थायरॉईड तपासणी 100 रुपये व तसेच आरोग्य शिबिर तपासणी फी शून्य रुपये आहे.
मोरया हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर मंगलसिंह परदेशी (M D )यांनी वाढदिवसानिमित्त गरजू रुग्णांसाठी एक मोठी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल रुग्ण व नागरिकांतून त्यांचे कौतुक होत असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त शेंदुर्णी शहरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.