शेंदुर्णीत गरुड अकॅडमीच्या माध्यमातून एज्युकेशन हब होण्याच्या दिशेने वाटचाल

8

प्रतिनिधी शेंदुर्णी ता. जामनेर – 

आ.ग.र.गरूड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथील कनिष्ठ महाविद्यालयात NEET,JEE चे क्लासेस ना नफा ना तोटा या तत्त्वावर आधारित ग्रामीण व निमशहरी भागात NEET,JEE सारखे क्लासेस लावण्यासाठी मुंबई पुण्याला किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज पडू नये तसेच ग्रामीण व निमशहरी परिसरातील मुला मुलींना आर्थिक दृष्ट्या परवडेल अशा स्वस्त दरात उच्च प्रतीचे व दर्जेदार क्लास उपलब्ध व्हावेत हा शुद्ध हेतू उराशी बाळगून दादासाहेब संजयरावजी गरुड यांच्या प्रेरणेने शैक्षणिक विचारांनी झपाटलेले युवा नेतृत्व भैय्यासाहेब स्नेहदीपजी गरुड यांच्या विचार संकल्पनेतून हा विचार पुढे आला व त्या दिशेने वाटचाल देखील सुरू झाली.या अनुषंगाने शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेच्या सर्व शाळांमधील दहावीनंतर बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना तर लाभ मिळावाच त्याचबरोबर शेंदुर्णी परिसरातील सर्व शाळांमधून असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा लाभ व्हावा म्हणून प्रत्येक शाळेला भेट देण्याचं काम युवा नेतृत्व स्नेहदीपजी गरुड व त्यांच्या समवेत असलेले बुद्धिजीवी मुंबई, पुण्यासारख्या शहरात NEET,JEE चे क्लास घेऊन या परीक्षेत ज्यांचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले आहेत असे तज्ञ,अनुभवी प्रा.जे आता हे क्लास यशस्वीरिता चालवून विद्यार्थ्यांना या परीक्षेत गुणवत्ता यादीत आणण्यासाठी धडपडतील असे प्राध्यापक टीमच्या चमूसह जिल्हाभरातील काही शाळा तसेच शेंदुर्णी परिसरातील काही शाळेतील विद्यार्थ्यांनाही लाभ मिळावा या उद्देशाने पालक व विद्यार्थ्यांना विद्यालयांमध्ये भेटी देऊन विद्यार्थी व पालकांचे समुपदेशन करण्याचे काम केले. या निमित्ताने गरुड महाविद्यालयाच्या प्रशस्त मिटिंग हॉलमध्ये पालक व विद्यार्थी विद्यार्थिनी यांची सहविचार सभा बोलविण्यात आली.या प्रसंगी भैय्यासाहेब स्नेहदीपजी गरुड यांनी पालक व विद्यार्थ्यांचे उद्बोधन करत आपल्या पाल्याची आपण कशी काळजी घ्यावी आपण आपल्या,मुला मुलींना बाहेर मुंबई पुणे किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी बाहेर क्लासेस लावत असतो, तिथे न परवडणारी क्लासेसची फीज,राहण्याचा खर्च,मेसचा खर्च इत्यादींचा,लेखाजोखा जर आपण केला तर तो आपल्याला न परवडणारा असल्याचं विश्लेषण करत योग्य असे मार्गदर्शन स्नेहदीपजी गरुड यांनी केले.यानिमित्ताने आपण आपल्या मुला-मुलींना करिअरच्या योग्य वाटेवरून जात असताना प्रत्यक्षपणे आपण त्यांच्या सोबतच आहोत असे समजून योग्य निर्णय घेण्याचे त्यांनी आवाहन केले.या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान विभागाचे प्रमुख प्रा.एस आर पाटील यांनी केले. तद्नंतर तज्ञ प्रा.घनश्याम पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात आपल्याला येणाऱ्या अडचणी व त्यावर आपण करत असलेले श्रम या संदर्भात सजग केलं व का म्हणून तुम्ही क्लास आपल्या ग्रामीण भागात लावले पाहिजे हे देखील स्पष्ट केले. यानिमित्ताने विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.चौधरी,महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्याम साळुंखे,डॉ.निर्मल अग्रवाल तसेच शेंदुर्णी व परिसरातील पालक,विद्यार्थी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सहविचार सभेला उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.जी पाटील यांनी केले. अशा पद्धतीने पालक,शिक्षक,विद्यार्थी,सहविचार सभा कार्यक्रमाचा समारोप यशस्वी पणे पार पडला.
कार्यक्रमाला बहुसंख्य पालक व विद्याथी उपस्थिती होते.