जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणाऱ्या 23 डॉक्टरांचा गौरव.डाँ.पवन पाटील यांनी साकारली कल्पना

5

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – जामनेर तालुक्यात खेड्यापाड्यावर,वस्ती तांड्यावर रात्रंदिवस अल्प दरात आरोग्य सेवा देणाऱ्या 23 डॉक्टरांना गुणगौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजमल नवाल होते.सुरुवातीला डॉ सॅम्युएल हनिमन जयंती निमित्त त्यांच्या व इतर महापुरुषांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सूत्रसंचालन डा.सीमा शिंदे, डा.यशवंत सूर्यवंशी,डॉ श्रीकांत दवंगे यांनी केले.
डा के एम जैन जामनेर,डा स्नेहाकिता लोखंडे, डॉ आर झेड ललवाणीजामनेर, डा अरुण चौधरीफत्तेपुर,डा सुभाष पाटील नेरी,डा सुरेंद्र जैन, डॉ. भारत पाटील पाळधी, डॉ. वि.टी.पाटील तोंडापूर,डॉ. ए.एम.चोरडिया वाकडी,डॉ. अरुण फिरके, फत्तेपूर,डॉ. नरेंद्र कुलकर्णी जामनेर,डॉ. मनोहर पाटील पाळधी, डॉक्टर येल्.यू. जैन नेरी, डॉ. वि.के.पाटील जामनेर,डॉ. किरण सूर्यवंशी शेंदुर्णी,डॉ. भास्कर पाटील नाचनखेडा,डॉ.अजय सुर्वे शेंदुर्णी,डॉ. विजयानंद कुलकर्णी शेंदुर्णी,डॉ. आनंदा बारी शेंदुर्णी, डॉ. शंकर पाटील, कार्यगौरव पुरस्कार डॉ. विश्वनाथ शेळके, डॉ.मनोज विसपुते, डॉ. देवानंद कुलकर्णी यांच्या या ठिकाणी सत्कार करण्यात आला.
सदर आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार गोविंद अग्रवाल भाजपा, जिल्हा उपाध्यक्ष. प्रवीण गरुड,स्नेहदीप गरुड,अमृत खलसे चेअरमन पंडित दीनदयाल पतसंस्था, सागरमल जैन माजी जिल्हा परिषद सदस्य,पंडितराव जोहरे, वैद्यकीय अधिकारी डाँ.मोहित जोहरे, शांताराम गुजर,माजी सरपंच शेंदुर्णी,जावा शेख, संजय सूर्यवंशी शिवसेना शहर प्रमुख आदींनी केला.
यावेळी गोविंद अग्रवाल, सागरमल जैन, डाँ.विजयानंद कुलकर्णी, डाँ.उर्मिला नवाल, डॉ देवानंद कुलकर्णी यांनी होमिओपॅथी उपचार पद्धती बद्दल माहिती सांगितली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डाँ.जितेंद्र पाटील अध्यक्ष,जामनेर तालुका होमिओपॅथिक असोसिएशन. डाँ.योगेश इंगळे सचिव, डॉ मनोज विसपुते, डॉ विश्वनाथ शेळके व आयोजक शेंदुर्णी शहर डॉक्टर असोसिएशनचे सर्व सदस्य यांनी केले.कार्यक्रम गुरुवारी शेंदुर्णी येथे गुरुकुल स्कूलच्या पटांगणावर घेण्यात आला.