पाचोरा प्रतिनिधी – पाचोरा शहर येथील शेख जावीद पत्रकार व लक्ष्मण आबा सूर्यवंशी काही कामानिमित्त प्रवीण सोडा जवळ गप्पा मारत असताना तेथे एका कामानिमित्त एक मुलगी व तिचा भाऊ आला असता त्यांचा साधारण १५ ते २० हजार किमंतीचा मोबाईल चुकून त्या ठिकाणी राहून गेला व ते तिथून निघून गेले त्यानंतर जावीद शेख पत्रकार व लक्ष्मण आबा सूर्यवंशी यांच्या लक्षात आले असता जावीद शेख यांनी तो मोबाईल आपल्या जवळ घेऊन लगेच पाचोरा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दिनेश भदाणे साहेब व पीएसआय श्री प्रकाश चव्हाणके साहेब यांच्या ताब्यात दिला असता सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दिनेश भदाणे साहेब यांनी त्या मोबाईलवरून त्यांच्या परिवाराशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले आमचा मोबाईल हरवला आहे त्यांना साहेबांनी सांगितले तुम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनला या लागलीच ती व्यक्ती पोलीस स्टेशनला आली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दिनेश भदाणे साहेब व पीएसआय श्री प्रकाश चव्हाणके साहेब यांनी हा मोबाईल खरोखर त्याचा आहे का याची खात्री करणे करता त्यांची माहिती घेतली तुमचा मोबाईल कोणत्या कंपनीचा व कशा कलरचा आहे त्यांनी सांगितले त्या वर्णन प्रमाणे हा तोच मोबाईल आहे याची खात्री करून तो मोबाईल हरवलेल्या व्यक्तीच्या ताब्यात दिला यावेळी त्या व्यक्तीने जावीद शेख यांचे आभार मानले. तसेच पाचोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दिनेश भदाणे साहेब श्री प्रकाश चव्हाणके साहेब यांचेही आभार मानले यावेळी पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी श्री दीपक पाटील समीर पाटील हे उपस्थित होते हरवलेला मोबाईल पुन्हा मिळाला त्याबद्दल त्याने पत्रकार जावीद शेख व यांचे विशेष आभार मानले आजही पत्रकारांमध्ये माणुसकीचे दर्शन घडवून आले आहे.